शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

मनाचिये गुंथी - गोड बोला, पण...

By admin | Updated: January 13, 2017 00:19 IST

दर वर्षी संक्रांतीच्या निमित्ताने तीळगुळ समारंभ होतो. घरोघरी त्याचे वाटप करुन गोड बोलण्याची आठवण करून दिली जाते.

दर वर्षी संक्रांतीच्या निमित्ताने तीळगुळ समारंभ होतो. घरोघरी त्याचे वाटप करुन गोड बोलण्याची आठवण करून दिली जाते. विसरण्याची शक्यता असते तिथे आठवण करून देण्याची गरज असते. हा आठवण करुन देण्याचा कालावधी तीनशे पासष्ट दिवसांचा आहे. म्हणजे गोड बोलण्याचा संदेश वर्षभर आपल्या लक्षात राहू शकतो असा त्यामागे पूर्वसुरींचा अंदाज असणार. त्यात काही बदल करण्याची गरज आहे का, हे पाहिले पाहिजे. व्यवहाराला प्राथम्य देणारी नवी मूल्य व्यवस्था उदयाला आली असल्याने गोड या शब्दाला काही नव्या अर्थछटांचा स्पर्श झाला आहे का, हे पाहिले पाहिजे.सामान्यपणे कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात. गोड या शब्दाची दुसरी बाजू म्हणजे कडू ! गोड आणि कडू हे दोन्ही शब्द परस्परांना पूर्णत्व देण्यासाठी सहाय्यभूत ठरतात. एकाला वगळून दुसऱ्याचा विचार करता येत नाही. म्हणजे गोडात थोडे कडू मिसळणे आलेच. कडू गोष्टी बऱ्याचदा औषधी असतात. औषध तर उघड उघड कडू असते, म्हणून त्याच्या गोळ्या साखरेत घोळून दिल्या जातात. औषध कडू असले तरी माणसाची प्रकृती सुधारावी म्हणून आवश्यक असते. हेच तत्व बोलण्यातही आपल्याला लागू करता आले पाहिजे. अती गोड म्हणजे विष आणि अती कडू म्हणजेसुद्धा विषच. त्यामुळे बोलताना या दोन्हीचे प्रमाण किती ठेवायचे याचे तारतम्य प्रत्येकाने बाळगले पाहिजे.आपण जरी गोड बोलत असलो तरी कधी ते तोंडदेखले, कधी वरवरचे, कधी तिरकस, कधी अतिशयोक्तीपूर्ण, तर कधी कुचेष्टापूर्ण देखील असू शकते. समोरच्या माणसाची आकलनक्षमता लक्षात घेऊनच यातील कोणता शब्दालंकार वापरायचा हे ठरवता आले पाहिजे, नाही तर गैरसमजुतीचा घोटाळा होणार हे नक्की ! एखाद्याच्या स्तुतीचा पतंग आकाशात उडवताना त्याचे जमिनीवरचे पाय तर सुटत नाहीत ना, याकडे लक्ष ठेवणे हीसुद्धा आपली जबाबदारी ठरते.आपल्याविषयी इतरांनी गोड बोललेले आपल्याला आवडते मात्र आपण इतरांच्या बाबतीत तसेच वागतो का, याचाही विचार करणे तितकेच महत्वाचे आहे. त्याही पलीकडे जाऊन तीळगुळ समारंभ हा केवळ एक उपचाराचा भाग तर झालेला नाही ना, हेही तपासून बघण्याची वेळ आली आहे. तोंडातली तीळगुळाची चव लुप्त व्हायच्या आतच माणसे पुन्हा कडू बोलायला सुरुवात करणार असतील तर रोजच्या रोज तीळगुळ समारंभ करूनही त्याला काही अर्थ राहणार नाही.- प्रल्हाद जाधव