जर्मनीमधील डर्मस्टॅड येथील अवकाश मोहीम नियंत्रण केंद्रात 2क् जानेवारी 2क्14 या दिवशी थोडी अस्वस्थता पसरली होती. नियंत्रण केंद्रात वावरणा:या प्रत्येकाच्या देहबोलीतून एक वेगळीच अधीरता व्यक्त होत होती. सर्वाचे कान एक महत्त्वाची अपेक्षित बातमी ऐकायला उत्सुक झाले होते. ते नियंत्रण केंद्र होते एका वेगळ्या आणि महत्त्वाकांक्षी अशा अवकाश मोहिमेचे. या साहसी अवकाश मोहिमेचे नाव होत ‘रोझेटा ऑर्बिटर मिशन’ या मोहिमेतील ‘रोझेटा ऑर्बिटर’ हे यान निघाले होते एका धूमकेतूला भेटायला. आता हे यान आज 12 नोव्हेंबरला 67स्र/उ-¬ असं नाव देण्यात आलेल्या धूमकेतूवर उतरत आहे.
या धूमकेतूचा अभ्यास करण्यासाठी रोझेटा ऑर्बिटरने पृथ्वीवरून 2 मार्च 2क्क्4 या दिवशी अंतराळात झेप घेतली होती. त्यानंतर यानाची कक्षा अशा प्रकारे ठरवण्यात आली होती, की ते तीन
वेळा पृथ्वीच्या जवळून आणि एकदा मंगळाच्या जवळून जाईल. या वेळी मोठय़ा ग्रहाच्या गुरुत्वशक्तीचा वापर करून यानाचा वेग आणि दिशा बदलली जात असल्याने याला ‘ग्रॅव्हिटी असीस्ट’ म्हटले जाते.
दि. 25 फेब्रुवारी 2क्क्7 या दिवशी रोझेटा ऑर्बिटर मंगळाच्या पृष्ठभागापासून फक्त 25क् किमी अंतरावरून गेले. या काळात 15 मिनिटांकरिता यान मंगळाच्या सावलीतून गेले. या 15 मिनिटांत सूर्यप्रकाश उपलब्ध नसल्याने यानाला धोका होता. या धोक्याला ‘द बिलियन युरो गॅम्बल’ म्हणजे अब्जावधी युरोंचा ‘जुगार’ असे म्हटले गेले. पण हा जुगार यशस्वी झाला. यान सुखरूपपणो अंतराळ प्रवास करत राहिले. या काळात यान जवळजवळ गुरू ग्रहाच्या कक्षेर्पयत जाऊ न आले. सौरऊर्जेवर एवढा दूरचा पल्ला गाठणारे ते पहिलेच यान ठरले.
दि. 2क् जानेवारी 2क्14 हा दिवस यानाच्या अंतराळ प्रवासातला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस होता. सुप्तावस्थेत असलेले यान आज ‘जागे’ होणार होते. यानाला ‘जागृतावस्थेत’ आणण्यासाठी एक स्वयंचलित गजर लावण्यात आला होता.
2क् जानेवारीला आंतराष्ट्रीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 1क् वाजता हा गजर सुरू होणो अपेक्षित होते. पण ही प्रक्रिया यशस्वीपणो पार पडलीय हे पृथ्वीवरील नियंत्रण केंद्राला समजायला 7 ते 8 तास लागणार होते. त्यामुळे 2क् जानेवारीला सकाळपासून नियंत्रण केंद्रात अस्वस्थता पसरली होती.
सायंकाळी 6 वा. 18 मिनिटांनी यान ‘जागे’ झाल्याची बातमी पोचली. बघताबघता सगळ्यांच्यात उत्साह संचारला. आता स्वत:च्या अक्षाभोवती फिरत पुढे सरकणारे यान फिरायचे थांबले. संपर्क प्रस्थापित करणारा अँटेना पृथ्वीच्या दिशेने होईल अशा प्रकारे यान फिरले आणि एक संदेश नियंत्रण केंद्रासाठी पाठवला गेला.
यान जागे झाल्यावर मे 2क्14 र्पयत यानावरील सर्व यंत्रणा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या. 67स्र/उ-¬ हा धूमकेतू आणि त्याच्या जवळून अभ्यासाकरता निघालेले रोझेटा ऑर्बिटर हे यान वेगवेगळ्या प्रतलातून वेगवेगळ्या गतींनी पुढे सरकत होते. दोघांची भेट घडवून आणण्यासाठी यानाच्या दिशेत बदल करणो आवश्यक होते.
हा बदल घडवण्याची प्रक्रिया मे ते ऑगस्ट 2क्14 या काळात करण्यात आली. या काळात एकूण दहा वेळा ‘ट्रॅजेक्टरी करेक्शन मॅन्युव्हर’ म्हणजे यानाची कक्षा आणि वेग बदलण्याकरिता प्रयत्न केले गेले. मे महिन्यात पहिल्या कक्षा बदलाच्या वेळी यान आणि धूमकेतू यांच्यात 19 लाख किलोमीटर एवढे प्रचंड अंतर होते. हे अंतर प्रत्यक्ष कक्षा बदलाच्या वेळी कमी करत करत 6 ऑगस्ट रोजी फक्त 1क्क् किमी एवढे करण्यात आले. 6 ऑगट रोजी यान धूमकेतूपासून 1क्क् किमी अंतरावरून धूमकेतूच्या वेगानेच प्रवास करू लागले. आता दोघांचा सूर्याच्या दिशेने समांतर प्रवास सुरू झाला होता.
कक्षा बदलाच्या काळात धूमकेतू आणि यान यांच्यातील अंतर जसजसे कमी होत होते तसतसे धूमकेतूच्या केंद्राचे चित्र स्पष्ट होत होते. हा धूमकेतू एका वैशिष्टय़पूर्ण आकाराचा आहे असे लक्षात येते आहे. सूर्यमाला निर्मितीच्या काळात म्हणजे साडेचार अब्ज वर्षापूर्वी मोठे ग्रह तयार होत असताना काही पाषाणखंड असे शिल्लक राहिले ज्यापासून मोठे ग्रह तयार होऊ शकले नाहीत. हेच पाषाणखंड आज आपल्याला लघुग्रह आणि धूमकेतूंच्या स्वरूपात सापडतात. 67स्र/उ-¬ हा धूमकेतू अशाच दोन मोठय़ा पाषाणखंडांपासून तयार झाला असावा असे वाटते. चोच आणि शेपूट नसलेल्या बदकाशी साधम्र्य दाखवणारा त्याचा आकार आहे. त्याची सर्वात जास्त लांबी 4.6 कि.मी आहे. हा धूमकेतू स्वत:भोवतीची एक फेरी 12.4 तासांत पूर्ण करतो तर सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला त्याला 6.5 वष्रे लागतात.
दि. 11 सप्टेंबर 1969 रोजी गेरासिमेन्को या खगोल अभ्यासकाने आकाशाच्या एका भागाचा फोटो घेतला होता. या फोटोचे बारकाईने निरीक्षण करताना 22 ऑक्टोबर 1969 रोजी च्युरुमॉव याला हा धूमकेतू सापडला. त्यामुळे याला च्युरुमॉव-गेरासिमेन्को असे नाव मिळाले. त्याच्या कक्षाची निश्चिती झाल्यावर असे लक्षात आले, की हा धूमकेतू दर 6.5 वर्षानी परत येतो. कालावधी निश्चित करण्यात आलेला हा 67 वा धूमकेतू ठरल्याने त्याला 67स्र आणि त्यापुढे संशोधकांच्या नावाची अद्याक्षरे असे मिळून 67स्र/उ-¬ हे नाव देण्यात आले. स्र हे अक्षर पिरीऑडीक म्हणजे वारंवार येणारा असे दर्शवते.
आजर्पयत या धूमकेतूच्या 7 फे:या निश्चित माहीत आहेत. त्यामुळे त्याची कक्षाही बरीच अचूक माहीत आहे. अवकाशयानाच्या मदतीने धूमकेतूचा अभ्यास करण्याकरतिा धूमकेतू निवडताना कक्षेची अचूक माहिती हा निकष महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा धूमकेतू निवडला गेला.
दि. 6 ऑगस्टपासून ऑक्टोबर्पयत धूमकेतूचे तपशीलवार निरीक्षण करण्यात आले. वेगवेगळ्या अंतरावरून वेगवेगळय़ा पृष्ठभागाचे तपशील दर्शवणारे फोटो मिळवण्यात आले. या मोहिमेचा एक वैशिष्टय़पूर्ण टप्पा आता सुरू होतो आहे. 12 नोव्हेंबर 2क्14 या दिवशी धूमकेतूच्या पृष्ठभागावर एक लॅडर उतरणार आहे. रोझेटा ऑर्बिटरच्या पोटातून हे लॅडर बाहेर पडेल तेव्हा धूमकेतू आणि यान यातील अंतर 22 किमी असेल. धूमकेतूची गुरुत्वशक्ती अतिशय कमी असल्याने लॅडर धूमकेतूच्या पृष्ठभागावर पोचायला अंदाजे 7 तास लागतील. ते आपटू नये याकरिता त्याच्या तीन पायांची विशिष्ट रचना करण्यात आली आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात धूमकेतूवरील 5 जागा ठरवण्यात येऊ न त्यातल्या ह्यख आणि ह्यउ याना अंतिम पसंती देण्यात आली. ह्यउ ही जागा पर्यायी म्हणून स्वीकारण्यात आली आहे.
या लँडवर एकूण 1क् तर ऑर्बिटरवर 11 विविध उपकरणो बसवण्यात आली आहेत. यांच्या मदतीने धूमकेतूच्या रचनेची माहिती पहिल्यांदाच उपलब्ध होणार आहे. हा धूमकेतू सध्या सूर्याच्या दिशेने साधारण 3क् किमी प्रतिसेकंद एवढय़ा वेगाने सरकतो आहे. तो सूर्यापासून किमान अंतरावर 13 ऑगस्ट 2क्15 या दिवशी पोचेल. त्या वेळेला त्याच्यावरून खूप मोठय़ा प्रमाणात धूलिकण आणि अनेक वायू आवकाशात फेकले जात असतील. त्यानंतर तो परत दूर जायला लागेल. रोझेटा ऑर्बिटर मोहिमेचा शेवट डिसेंबर 2क्15 असा ठरवण्यात आला आहे. या मोहिमेतून धूमकेतूमध्ये होणारे भौतिक बदल प्रत्यक्ष प्रयोगांनी प्रथमच अनुभवता येतील.
राम जोशी
खगोल अभ्यासक