शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटनमध्ये पुन्हा कॅमरॉन सरकार

By admin | Updated: May 8, 2015 23:30 IST

डेव्हिड कॅमरॉन सरकार पुन्हा एकदा, तेही स्वबळावर, ब्रिटनमध्ये सत्तेवर येणार, यावर मतदारांनी शिक्कामोर्तब केले आहे. हुजूर पक्षापुढे खूप मोठे

डेव्हिड कॅमरॉन सरकार पुन्हा एकदा, तेही स्वबळावर, ब्रिटनमध्ये सत्तेवर येणार, यावर मतदारांनी शिक्कामोर्तब केले आहे. हुजूर पक्षापुढे खूप मोठे आव्हान मजूर पक्षाने उभे केले असल्याचे निवडणूक प्रचाराच्या दरम्यान रेखाटले गेलेले चित्र आणि त्याला मतदार चाचण्यांनी दिलेला दुजोरा, डेव्हिड कॅमरॉन यांनी खोटा ठरवला आहे. असे घडले यास ब्रिटनमध्ये जे मूलभूत, विशेषत: आर्थिक बदल कॅमरॉन सरकारने घडवून आणले, ते कारणीभूत आहेत. ब्रिटनमध्ये बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले आहे. किमतीही आटोक्यात आहेत. अर्थात अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी कॅमरॉन सरकारला काही अप्रिय पावले टाकावी लागली. खर्चात कपात करणे अपरिहार्य ठरले. त्यामुळे असंतोषही निर्माण झाला. नेमका हाच असंतोष संघटित करून कॅमरॉन सरकारला आव्हान देण्याची रणनीती मजूर पक्षाने आखली. श्रीमंतांवरील कर वाढवणे, विषमता कमी करणे, यासाठी काय उपाय योजायला हवेत, यावर मजूर पक्ष भर देत होता. कॅमरॉन सरकारच्या धोरणांचा ज्या समाजघटकांना फटका बसत होता, त्यांचा या भूमिकेला पाठिंबा मिळत होता. त्यामुळे हुजूर पक्षाला ही निवडणूक कठीण जाणार व त्रिशंकू संसद अस्तित्वात येणार, अशी भाकिते वर्तवली जात होती. निवडणुकीत लोकांना रस नाही, प्रचार कंटाळवाणा ठरत आहे, असे बहुतेक राजकीय निरीक्षक म्हणत होते. पण निवडणूक प्रचारात थोडी फार जान येत होती, ती स्कॉटिश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या नेत्या निकोला स्टरजिआॅन यांच्या आक्रमक प्रचारामुळेच. त्यात भर पडत होती, ती आर्थिक धोरणांना विरोध असलेल्या समाजघटकांच्या बोलक्या असंतोषाची. त्यामुळेच हुजूर पक्ष अडचणीत येत असल्याचे चित्र उभे राहत गेले. मतदान चाचण्यांचे अंदाज चुकण्याचे हे एक महत्त्वाचे कारण ठरले. गेल्या तीन साडेतीन दशकातील ब्रिटनचे राजकारण म्हणजे हुजर व मजूर या दोन्ही पक्षांत होत गेलेले बदल आणि त्यामुळे एका ठरावीक कालावधीनंतर दोघात निर्माण होणाऱ्या चुरशीचा घटनाक्रम आहे. आज जागतिकीकरण, खुली अर्थव्यवस्था इत्यादी गोष्टी मान्य होऊ लागल्या आहेत. पण तशा त्या मान्यता पावलेल्या नव्हत्या, त्या काळात मार्गारेट थॅचर यांनी ही वैचारिक भूमिका आक्रमकपणे मांडून दीर्घकाल सत्तेवर असलेल्या मजूर पक्षाचा पराभव केला आणि नंतर प्रत्यक्षात या वैचारिक भूमिकेला अनुसरून असलेली धोरणे अंमलात आणून ब्रिटनच्या अर्थव्यवहारात आमूलाग्र बदल घडवून आणले. त्यामुळे मजूर पक्षालाही आपल्या धोरणात्मक चौकटीत बदल करणे अपरिहार्य बनले. त्यातूनच टोनी ब्लेअर यांनी नव्याने मजूर पक्षाची वैचारिक भूमिका आकाराला आणून तोपर्यंत प्रस्थापित झालेल्या हुजूर पक्षाच्या हातून सत्ता हिसकावून घेतली. ब्लेअर यांच्यानंतर आलेल्या मजूर पक्षाच्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीत हुजूर पक्ष पुन्हा नव्याने संघटित होत गेला आणि कॅमरॉन यांनी २०१० साली पुन्हा पक्षाला सत्ता मिळवून दिली. पण ही सत्ता एकहाती नव्हती. आधुनिक काळातील ब्रिटनच्या इतिहासात प्रथमच कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. पण हुजूर पक्षाने लिबरल डेमॉक्रॅटिक पक्षाच्या मदतीने आघाडीचे सरकार बनवले. आता पाच वर्षांनंतर हुजूर पक्षाला जवळ जवळ स्वबळावर सरकार बनवण्याएवढे संख्याबळ मतदारांनी मिळवून दिले आहे. हा जो गेल्या तीन साडेतीन दशकांचा घटनापट आहे, त्याचे कारण जगात व ब्रिटनमध्येही होणाऱ्या बदलाच्या प्रभावाखाली मतदारांच्या मनोभूमिकात झालेले स्थित्यंतर हे आहे. स्कॉटलंडपुरत्या मर्यादित असलेल्या स्कॉटिश नॅशनॅलिस्ट पार्टीला मिळालेले अभूतपूर्व यश हा या स्थित्यंतराचाच परिणाम आहे. सुखी व समाधानी जीवन जगण्याची हमी आणि त्यासाठी आखलेली धोरणे ही जनसमूहांना आकर्षित करीत आहेत. त्यांना अशा धोरणांची कार्यक्षम अंमलबजावणी झालेली हवी आहे. पण असे घडून यायचे, तर मुक्त अर्थव्यवहारावर आधारलेल्या धोरणांमुळे जो विकास होईल, त्याचे फायदे समाजाच्या सर्व थरात जास्तीत जास्त पोचले पाहिजेत. येथे राज्यसंस्थेची (स्टेट) भूमिका निर्णायक ठरत असते. ही भूमिका जर कार्यक्षमतेने व परिणामकारकरीत्या निभावली गेली नाही, तर दुर्बल समाजघटक अशा फायद्यांपासून वंचित राहतात. विषमता वाढत जाते. त्यातून अन्यायाची भावना रूजते. इतिहासापासून ते विद्यमान काळापार्यंतच्या झालेल्या अन्यायाच्या कारणांचा आधार घेऊन विरोधाचा पवित्रा घेतला जातो. या समाजघटकांच्या अस्मिता धारदार होतात. स्कॉटलंडमध्ये नेमके तेच झाले. हा प्रांत ‘युनायटेड किंगडम’पासून वेगळा व्हावा की नाही, यासाठी झालेले सार्वमत स्कॉटिश अस्मितेची भूमिका घेणाऱ्यांच्या विरोधात गेले. पण स्कॉटिश अस्मिता ओसरली नव्हती, हे ताज्या निवडणुकीतील स्कॉटिश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या यशाने दाखवून दिले आहे. स्कॉटिश जनतेला ‘युनायटेड किंगडम’मध्येच राहायचे आहे, पण सन्मानाने व इतरांना देण्यात येणारे फायदे मिळवूनच, असा या यशाचा अन्वयार्थ आहे. या पाशर्वभूमीवर ‘मला एका देशाचा, एकात्मिक युनायटेड किंगडम’चा राज्यकारभार करायचा आहे, हे कॅमरॉन यांचे उद्गार पुढच्या आव्हानांची त्यांना प्रखर जाणीव असल्याचे दर्शवतात.