शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

पर्यावरणाशी दोस्ती करतेय प्रगत तंत्रज्ञान

By admin | Updated: June 12, 2016 05:10 IST

पर्यावरण म्हटले की जमीन, हवा आणि पाणी हे निसर्गाचे तीन हात डोळ्यासमोर येतात. उन्हाळ्याची तप्त हवा, त्याने जमिनीला पडलेल्या दुष्काळी भेगा, आटलेल्या विहिरी, आटलेल्या नद्या, पाण्याचे दुर्भिक्ष

- माधव शिरवळकर पर्यावरण म्हटले की जमीन, हवा आणि पाणी हे निसर्गाचे तीन हात डोळ्यासमोर येतात. उन्हाळ्याची तप्त हवा, त्याने जमिनीला पडलेल्या दुष्काळी भेगा, आटलेल्या विहिरी, आटलेल्या नद्या, पाण्याचे दुर्भिक्ष, उकाड्याने होत असलेली तहान तहान याने त्रासून गेलेला माणूस समोर दिसू लागतो. नदी म्हटले आणि भारताच्या नकाशावर उत्तरेकडे पाहिले की हिमालयातून निघून पार उत्तर प्रदेश आणि बंगालपर्यंत वाहणारी गंगा ठळकपणे दिसते. अत्यंत पवित्र म्हणून पुराणकाळापासून प्रसिद्ध असलेली गंगा नदी आज मानवाच्या कारनाम्यांमुळे पुरती प्रदूषित झाली आहे. उकाड्यापासून सुटका करण्यासाठी थंडावा आणणारा एअरकंडिशनर जिकडे तिकडे दिसतो. पण संपूर्ण जगाचा वाढता उकाडा ग्लोबल वॉर्मिंगच्या रूपाने आता धमकावू लागला आहे. ग्लोबल वॉर्मिंगला पुरा पडणारा कोणताही एअर कंडिशनर आज मानवाकडे नाही.एअर कंडिशनर असो, संगणक असो, इतर अत्याधुनिक उपकरणे असोत, विजेची गरज सतत वाढती आहे. वाढती गरज भागवण्यासाठी अधिकाधिक वीजनिर्मिती करणे भाग आहे. अधिक प्रमाणात वीजनिर्मिती करायची म्हणजे अधिक प्रमाणात कोळशाच्या भट्ट्या जळत राहणार. आज देशातला कोळसा वीजनिर्मितीसाठी अपुरा पडतो. त्यामुळे बाहेरून कोळसा आयात करून आपण तो देशांतल्या वीजभट्ट्यांतून जाळतो. हा लाखो टन जळणारा कोळसा गंगा नदीप्रमाणे आपली हवा प्रदूषित करीत राहतो. मानवी जीवनाला अत्यंत धोकादायक असा कार्बन डायाक्सॉइड आणि कार्बन मोनाक्साइड त्यातून हजारो मैलांपर्यंत हवेत पसरत राहतो. खेरीज, कोळशाची राख कुठे टाकायची हाही प्रश्न असतोच. कारण ती राख आपली जमीन आणि पाणी प्रदूषित करू शकते. वीजनिर्मितीसाठी जळणारा कोळसा हे एक उदाहरण झाले. पण आपले कारखाने, आपले उद्योगही हवा आणि पाण्यापुढे आव्हाने उभे करीत असतात. पर्यावरणावर गंडांतर आणणारी ही परिस्थिती रोखण्यासाठी मानवाचे प्रयत्न तुटपुंजे ठरत आहेत हे तर धडधडीतपणे समोर दिसतेय. अशा वेळी एक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतो की सारे जग बदलून टाकणारे तंत्रज्ञान पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काही मदत करू शकेल की नाही? की, हातातल्या मोबाइलपुरतीच प्रगत तंत्रज्ञानाची उडी आहे? पर्यावरणाच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी, निसर्गाचे हात बळकट करण्यासाठी आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान नेमकी कोणती पावले आज टाकते आहे?आपल्याकडे जसे गंगेचे खोरे आहे, तसे तिथे आॅस्ट्रेलियामध्ये कुपर क्रीकच्या नदीचे खोरे आहे. एक लाख चौरस किलोमीटर पसरलेल्या या खोऱ्यात एक अजब प्रकल्प सुरू झाला आहे. त्या प्रकल्पाचे नाव आहे ईजीएस प्रकल्प. या खोऱ्याच्या भूगर्भात तडे गेलेले प्रचंड असे खडक आहेत. त्या खडकांचे तापमान कायम २५० सेंटीग्रेड असते. आता प्रगत तंत्रज्ञानाची किमया पाहा. या खोऱ्यात खोदकाम करण्यात आले. किती खोल? तर जमिनीखाली सुमारे ४ मैल खोल. खोदकाम केलेली एक विहीर असे आपण धरले तर काही मैलांवर इतर आणखी काही विहिरी त्या खडकांपर्यंत खोल खणण्यात आल्या. उद्देश हा की त्या अतिउष्ण अशा खडकांमधील उष्णतेचा वापर करून विजेची निर्मिती करायची. एका विहिरीतून खाली थंड पाणी सोडण्यात आले. ते जेव्हा खडकांपर्यंत पोहोचले तेव्हा २५० सेल्सिअस तापमानाने त्या पाण्याची वाफ बनू लागली. ती वाफ पुन्हा वर जमिनीवर आणून त्या वाफेच्या शक्तीवर वीजनिर्मितीचा प्रकल्प उभा राहिला. खडकाच्या प्रचंड भेगांमध्ये सोडलेले पाणी भेगांतून वाहत एका विहिरीकडून दुसऱ्या विहिरीकडे वाहत जाते. प्रत्येक विहिरीतून अतिउष्ण वाफेची प्रचंड उपलब्धता तयार होते आणि दिवसांतले चोवीस तास वीजनिर्मिती होते. भूगर्भातील उष्णतेचा वापर झाल्यामुळे कोणतेही प्रदूषण नाही. कोळसा जाळणे नाही. हवेत कार्बन डायआॅक्साइड किंवा मोनॉक्साइड नाही. प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञान पर्यावरणाशी कशा प्रकारे मैत्री करू शकते याचे हे एक बोलके उदाहरण. असे प्रयत्न अजूनही संशोधनावस्थेत आहेत. जमिनीखाली ४ किलोमीटर खोल असलेल्या उष्ण खडकांना कामाला लावणे म्हणजे निसर्गाशी खेळच आहे. त्यातून काय परिणाम भविष्यकाळात होऊ शकतात याचा अंदाज घेण्याचाही शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे. पण, आज तरी पर्यावरणाशी घट्ट मैत्री करीत तेथे वीजनिर्मिती होते आहे. रोज आभाळात उगवणाऱ्या सूर्याचे दुसरे नाव आहे ‘मित्र’. सूर्याला मित्र हे नाव पुराणकाळात ज्याने दिले तो मोठाच द्रष्टा म्हटला पाहिजे. याचे कारण सूर्य पर्यावरणाचा खरा मित्र आहे. त्याच्या मित्रत्वाच्या ज्या अनेक बाजू आहेत त्यातली एक खूप महत्त्वाची बाजू म्हणजे सौरशक्तीतून होणारी वीजनिर्मिती. अमेरिकेत सॅन जोन भागात गुगल कंपनीचे मुख्यालय आहे. त्या मुख्यालयाच्या छपरावर सर्वत्र सौरऊर्जेची अक्षरश: शेकडो पॅनेल्स दिसतात. यातून गुगलला लागणारी वीज मिळते. पण, तो झाला गुगल कंपनीपुरता भाग. जगात आज सौरशक्तीच्या वापरातून मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती करण्याचे प्रयत्न आणि संशोधन सर्वत्र चालू आहे. कोणी म्हणेल की दिवसातले जेमतेम आठ-दहा तासच सूर्यप्रकाश मिळतो.तेवढ्या वेळात होईल तेवढीच वीजनिर्मिती. रात्री ते सोलर पॅनेल्स काय कामाचे? त्यांचा प्रश्न चुकीचा नाही. रात्री आभाळात सूर्य नसतो, तर सौरशक्ती कशी मिळणार? आता ही मर्यादा आली म्हणून गप्प बसेल तर ते आधुनिक विज्ञान कसले. त्यांनी शोध सुरू केला तो चोवीस तास सौरऊर्जा उपलब्ध होईल अशा जागेचा. असे म्हणत की इंग्रजांच्या भारतावरील सत्तेचा सूर्य कधी मावळत नाही. पण शेवटी तो मावळलाच. पण न मावळणारा सूर्य, चोवीस तास सौरशक्ती मिळेल अशी जागा कोणती? शास्त्रज्ञांनी ती जागा शोधली. ती जागा म्हणजे अंतराळ. सूर्याचे उगवणे आणि मावळणे ही पृथ्वीवरील परिस्थिती आणि संकल्पना. अंतराळाला कसली रात्र आणि कसली सकाळ? अंतराळाला सूर्याचे दर्शन चोवीस तास असते. आता या परिस्थितीचा वापर करून तेथे उपलब्ध असलेल्या सौरशक्तीचा वापर चोवीस तास करायचा आणि तेथे तयार झालेली वीज पृथ्वीवर आणून वापरायची हा प्रयत्न आजचे प्रगत तंत्रज्ञान करू पाहते आहे. हे संशोधन आजही बाल्यावस्थेत आहे, पण त्याची दिशा निश्चित झाली आहे. येत्या दशकात कदाचित किंवा निदान येत्या पंचवीस वर्षांत पृथ्वीवरील वीजनिर्मिती थांबून सारी वीज अंतराळातून तयार होऊन खाली येईल का? हा प्रश्न आज अनुत्तरित आहे. पण त्याचे सकारात्मक उत्तर जेव्हा मिळेल तेव्हा पर्यावरणाचा श्वास आणखी सुकर होईल यात शंका नाही. - इसवी सनापूर्वी ७०० वर्षे अगोदर चीनमध्ये एक प्रयत्न झाला होता असे संदर्भ सापडतात. तो प्रयत्न म्हणजे एकाच वेळी अनेक आरसे लावून, त्या आरशांमध्ये सूर्यप्रकाश एकवटून त्यातून उष्णता निर्माण करणे. त्या काळात जाळ तयार करण्यासाठी त्यांनी आरशांचा उपयोग केला असेल कदाचित. पण तेच तत्त्व वापरून वीजनिर्मिती करण्याचे प्रयत्न युरोप व आफ्रिकेत होऊ लागले आहेत. - स्पेन, अल्जिरिया, मोरोक्को वगैरे देशांनी त्यात गुंतवणूकही केली आहे. अनेक आरसे उभारून त्यातून सूर्याची एकाग्र किरणे रसायन असलेल्या एका मोठ्या भांड्यावर पाडायची. स्वाभाविकच भांड्यातील रसायन उकळेल व त्यातून वाफ तयार होईल. त्या वाफेतून वीजनिर्मिती करायची अशी ती संकल्पना आहे. च्आफ्रिकेतील वाळवंटी प्रदेशात प्रचंड प्रमाणावर सौरशक्तीतून उत्पन्न होणारी उष्णता असते. तेथे तयार झालेली वीज युरोपात न्यायची असे प्रयत्न तिथला माणूस करू लागला आहे. शास्त्रज्ञांचेप्रयत्न शास्त्रज्ञांचा प्रयत्न असा आहे की अंतराळात सोलर पॅनेल्स उभे करायचे. हे पॅनेल्स पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर असल्याने त्यातून निर्माण होणारे काही अनिष्ट घटक असतील तर मुळात ते पृथ्वीपर्यंत पोहोचणारच नाहीत. अंतराळातील हे सोलर पॅनेल्स त्यांच्यावर पडणारी सौरशक्ती एका रिसेप्टर नामक साधनाकडे पाठवतील व तेथे त्यातून वीजनिर्मिती होईल. ही निर्मिती बिनबोभाट आणि चोवीस तास होणारी असल्याने अखंड असेल. हे तंत्रज्ञान खूपच खर्चीक आहे याची कल्पना शास्त्रज्ञांना आहे. त्या दृष्टीनेही एकीकडे संशोधन चालले आहे.