शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

गीतगायनातून ‘प्रेमस्वरुप आई’चे गुणगान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 22:12 IST

विविध कार्यक्रम : झेड.बी. पाटील महाविद्यालयात स्नेहसंमेलन, पालक मेळावा

धुळे : शहरातील जयहिंद शैक्षणिक संस्था संचलित झेड.बी. पाटील महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘रंगचैतन्य’निमित्त युवती सभेअंतर्गत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी गीतगायनाच्या माध्यमातून ‘प्रेमस्वरुप आई’ ही संकल्पना सादर केली.कार्यक्रमाचे उद्घाटन जयहिंद शैक्षणिक ट्रस्टच्या संचालिका तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.डॉ.निलिमा पाटील यांच्याहस्ते झाले. व्यासपीठावर संचालिका स्मिता साळुंखे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच. पवार उपस्थित होते.प्रा.डॉ. निलिमा पाटील म्हणाल्या, आईची भूमिका जरी काळानुसार बदलत आहे. तरी आपल्या विकासामध्ये आईला दुसरा पर्यायच नाही.आपल्या जडणघडणीत आईचा वाटा मोठा आहे. प्राचार्य डॉ.पी.एच. पवार म्हणाले, जर समाजातील आई उद्ध्वस्त झाली तर कुटुंब व्यवस्थाच उद्ध्वस्त होईल.‘प्रेमस्वरुप आई’ या भावमधुर गीतगायन कार्यक्रमात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी पल्लवी सैंदाणे, धनंजय पवार, मोहिनी मिस्त्री, पवार, लीना बारी, ऋषिकेश पाटील यांनी गीत सादर केले. वादकांची साथ नितीन पवार, वीरेंद्र सैंदाणे, चिराग श्रॉफ मनोज गुरव, गौरव कांळगे, धीरज वाघ यांनी दिली तर निवेदन जयश्री पवार व हर्षल मराठे यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी, पालक व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळच्या सत्रात वार्षिक स्नेहलसंमेलनानिमित्त महाविद्यालयात रांगोळी, मेहंदी व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन संचालिका डॉ.निलिमा पाटील यांच्याहस्ते झाले. मेहंदी स्पर्धेचे उद्घाटन संचालिका स्मिता साळुंखे यांच्याहस्ते तर पाककला स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.पी.एच. पवार यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.चुडामण पगारे, उपप्राचार्या डॉ.विद्या पाटील, उपप्राचार्य प्रा.व्ही.एस. पवार, स्नेहसंमेलन संयोजक डॉ.टी.जे. पाटील व डॉ.वर्षा पाटील आदी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ.चुडामण पगारे, उपप्राचार्या डॉ.विद्या पाटील, उपप्राचार्य प्रा.व्ही.एस. पवार, उपप्राचार्या अनिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवती सभा संयोजक प्रा.स्वाती देसले, तसेच समिती सदस्य प्रा.भाग्यश्री पाटील, प्रा.पुनम देवरे, प्रा.कल्पना देवरे, प्रा.डॉ. अमोल पाटील, प्रा.अलका पंजाबी, डॉ.विद्या पाटील, प्रा.गितांजली बागल, प्रा.हर्षल गवळे, प्रा.जितेंद्र पाटील, प्रा.रुपाली चव्हाण, प्रा.स्वप्निल पाडवी, प्रा.मिनाक्षी बाजपेयी, प्रा.प्रतिक शिंदे, प्रा.सुर्यकांत गायकवाड, प्रा.डॉ. तेजस्वीनी कुरणे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.भाग्यश्री पाटील यांनी केले.

टॅग्स :Dhuleधुळे