धुळे : जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्व विरूध्द भाजप असा प्रयोग यशस्वी केल्याबद्दल नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भाजपच्या राज्य अधिवेशनात सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले, महाराष्ट्रात येणाºया प्रत्येक निवडणुकीत सर्व विरूध्द भाजप असाच सामना करावयाचा असून त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच नुकत्याच झालेल्या धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत ५६ पैकी ३९ जागा जिंकत भाजपने हा प्रयोग यशस्वी केला आहे. त्याबद्दल भाजपचे निवडणूक प्रभारी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, खासदार डॉ.सुभाष भामरे, नवनिर्वाचित जि.प. अध्यक्ष तुषार रंधे, उपाध्यक्ष कुसूम कामराज निकम, महिला बालकल्याण सभापती धरती देवरे, कृषी सभापती बापू खलाणे यांचा सत्कार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे- पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 12:18 IST