धुळे : वाडीभोकर रोडवरील रामनगरात असलेल्या जलकुंभ परिसर विविध समस्यांच्या गर्तेत सापडला आहे़ गवत मोठ्या प्रमाणावर वाढले असून मच्छरांचा त्रास होत आहे़ डुकरांसह कुत्र्यांचा मुक्तसंचार आहे़ याठिकाणी सुरक्षा रक्षकच नसल्याने सर्वकाही आलबेल असल्याचे समोर येत आहे़वाडीभोकर रोडवर रामनगरात जलकुंभ आहे़ या जलकुंभाच्या माध्यमातून परिसरातील कॉलन्यामध्ये पाणीपुरवठा केला जातो़ पण, पाणी गळतीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डबके साचलेले आहे़ परिणामी मच्छरांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे़ गवताचेही प्रमाण आता मोठ्या प्रमाणावर झालेले आहे़ याकडे महापालिका प्रशासनाला बघायला वेळ नाही़तसेच जलकुंभ आवारात हायमास्ट लावण्यात आला होता़ पण, तो गेल्या कितीतरी दिवसांपासून बंदच आहे़ त्यामुळे रात्रीच्यावेळेस या भागात वावरणे जिकरीचे झाले आहे़ नियमित स्वच्छता होत नाही़ डुकरे आणि कुत्रे मोकाटपणे जलकुंभाच्या आवारात असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे़ या समस्यांकडे अनिल गोटे यांनीही लक्ष वेधले होते़सुरक्षा रक्षकाची गरजरामनगर जलकुंभाच्या ठिकाणी केवळ व्हॉलमन आहेत़ सुरक्षा रक्षक नसल्यामुळे सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र आहे़ कोणीही या, कोणीही जा अशी स्थिती आहे़ सुरक्षा रक्षक राहिल्यास वचक निर्माण होऊ शकतो़
धुळ्यातील देवपूर भागातील ‘रामनगर जलकुंभ’ परिसर समस्येंच्या गर्तेत़़़!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 22:20 IST