धुळे : लॉकडाऊन काळात वाढलेल्या हिंसाचाराच्या विरोधात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेतर्फे सोमवारी राज्यव्यापी आॅनलाईन आंदोलन करण्यात आले़आॅनलाईन आंदोलनात सहभागी झाल्यानंतर महाराष्ट्र सेक्रेटरी राकेश अहिरे, जिल्हाध्यक्ष सिध्दांत बागुल, सतिश खैरनार, मनोज नगराळे, जितेंद्र अहिरे, सुजीत गेडाम, अतुल बैसाणे, दीपक बैसाणे, महेंद्र शिंदे, आकाश सोनार, मानसी ढिवरे, हरिष मोरे, संदीप वानखेडे, राजेश सावळे, दीपक बच्छाव, काजल मोरे, मानसी पवार, रोहिणी जगदेव, हर्ष मोरे, हर्षल वाघ, मनीष दामोदर, संदीप खेरनार, मधुकर थोरात, शत्रुघ्न शिंदे, सुजाता मोरे, प्रसेनजित जगदेव, उत्पलवर्णा मोरे आदींनी विविध मागण्यांचे पोस्टर हातात घेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली़ त्यानंतर दोन जणांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले़निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या महामारीमुळे सूपर्ण देशात लॉकडाऊन असताना दलित, आदिवासी, स्त्रिया, भटके विमुक्त, कामगार, शेतकरी, विद्यार्थी यांच्यावर होत असलेल्या हिंसेचे व अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे़ त्यामुळे समाजामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून हिंसाचार करणारे समाजामध्ये मोकाट फिरत आहेत़जात्युच्छेदक कायदा करावा, भारतीय संविधान अनुच्छेद १५ नुसार जातीभेद करणाºयांवर कडक कारवाई करावी, जातीय झुंडशाहीतून निर्माण होणारे आॅनर किलिंग सारखे प्रकार राखावे, जातीय द्वेषातून दलितांवर होणारे अन्याय थांबवावे, शिक्षण प्रणालीमध्ये निर्माण झालेली फॅसीस्ट भांडवली व्यवस्था नष्ट करावी, भांडवली शिक्षण व्यवस्थेने केलेल्या हिंसेची भरपाई देविका बालकृष्णन यांना द्यावी, डिजिटल शिक्षण व्यवस्थेमुळे दलित, आदिवासी, स्त्रियांवरील हिंसा रोखण्यासाठी ही शिक्षण व्यवस्था बंद करावी, प्रेमाला होकार आणि हिंसेला नकार याबाबत सरकारने प्रबोधन करावे, प्रत्येक विवाह आंतरजातीय व्हावा यासाठी राज्य तसेच केंद्र शासनाने कायदा करावा यासह १८ मागण्या निवेदनात आहेत़आॅनलाईन आंदोलन राज्यव्यापी होते़ सकाळी नऊला विविध मागण्यांचे पोस्टर हातात घेवून घराबाहेर फोटो काढले़ त्यानंतर सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या राज्याच्या फेसबुक पेजवर एकाच वेळी राज्यभरातून आंदोलनाचे फोटो शेअर करण्यात आले़
वाढत्या हिंसाचाराच्या विरोधात आॅनलाईन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 21:50 IST