धुळे : जिल्ह्यातील १० जणांनी कोरोनावर मात केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच पुन्हा धुळे जिल्ह्यात आणखी नऊ जणांना कोरोनाची लागण झालेली . यापैकी दोघांचा मृत्यू झालेला आहे. या सातपैकी नेहरूनगरातील ३, जिल्हा कारागृहातील ३, इंद्रप्रस्थनगरातील एक रूग्णाचा समावेश आहे. गल्ली नंबर ७ मधील एकाचा मृत्यू झालेला असून, एकाचे ठिकाण अद्यापही समजू शकलेले नाही. दरम्यान जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७९ झालेली असून, मृतांचा आकडा १० झालेला आहे. आतापर्यंत ४१ जणांनी कोरोनावर मात केलेली आहे.
जिल्ह्यात आणखी ९ जण पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 17:33 IST