शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

मुस्लीम युवकाची ‘विवाह’ क्रांती

By admin | Updated: February 8, 2017 01:24 IST

दोंडाईचा : येथील वसीम इब्राहीम शेख या उच्चशिक्षित मुस्लीम तरुणाने कट्टर धार्मिकतेला फाटा देत आपल्या विवाहाचा स्वागत समारंभ हिंदू पद्धतीने केला

 

सर्वधर्मसमभावाचे बाशिंग : हिंदू पद्धतीने निमंत्रण पत्रिका व स्वागत समारंभमुस्लीम युवकाची ‘विवाह’ क्रांती दोंडाईचा : येथील वसीम इब्राहीम शेख या उच्चशिक्षित मुस्लीम तरुणाने कट्टर धार्मिकतेला फाटा देत आपल्या विवाहाचा स्वागत समारंभ हिंदू पद्धतीने केला. गेल्या महिन्यात 4 जानेवारी रोजी दोंडाईचा येथे त्याने हे क्रांतिकारक पाऊल उचलून सर्वधर्मसमभावाचा आदर्श घालून दिला.   वसीम इब्राहीम शेख हा एम.एस्सी. बी.एड. असा उच्चशिक्षित असून 1 जानेवारी 2017 रोजी त्याचा विवाह चोपडा येथे  नाजीया  शेख हिच्याशी झाला. यानंतर त्याने 4 जानेवारी रोजी दोंडाईचा येथील आपल्या राहत्या घरी मित्रमंडळी व हितचिंतकांसाठी स्वागत समारंभाचे आयोजन केले. या समारंभाची पत्रिका त्याने पूर्णपणे हिंदू धर्मीयांच्या पद्धतीने छापून सर्वाना आश्चर्यचकित केले.  या स्वागत समारंभावेळी  वसीम याने राणीपुरा भागातील गणपती मंदिरात जाऊन ‘श्रीं’च्या चरणी माथा टेकला. घोडय़ावर बसून मिरवणूकही काढली. अनेक हिंदू बांधव या सोहळ्यात उपस्थित होते. वसीम हा केमिस्ट आहे, तर त्याचे वडील इब्राहीम शेख एका सोसायटीत कामाला होते.हिंदू धर्माप्रमाणे साकारली लग्नपत्रिकामी उच्चशिक्षित असून इतिहास वाचला आहे. अन्य धर्मातील देवतांना मी मानतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचाही इतिहास मी वाचला आहे. मुस्लीम बांधवांनाही शिवराय  समानतेची वागणूक देत होते. मुस्लिमांसाठी त्यांनी अनेक सुधारणा केल्या. त्यांचे सरदारही मुस्लीम होते. त्यामुळे मी आमंत्रण पत्रिकेत त्यांचा फोटो छापला. शिवमुद्राही छापली आणि जय गणेश, जय भवानी, जय शिवाजी असा जयघोषही छापला.    - वसीम इब्राहीम शेख