धुळे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालय, शिकवण्या बंद झाल्या आहेत. रिकाम्या वेळेत विद्यार्थ्यांना घरबसल्या शिकवणी घेतली जावी या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक प्रा. डॉ. वैभव सबनीस यांनी मात्र झुम, हँग आऊट,व्हाट्सअप ग्रुपव्दारे शिकवनी घेत आहे.बी.ए.एलएल.बी प्रथम आणि द्वितीय या दोन वर्गांना ते नियमितपणे दररोज झूम या अॅपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्याख्यान देत असतात.एकीकडे परीक्षेच्या बाबतीत संभ्रम असताना आणि कोरोना आणखी पसरत असताना, ज्यावेळेस सगळीकडे अनिश्चितता आहेतेथे ज्ञानामध्ये वृद्धी व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या करिअरला कुठलीही बाधा येऊ नये या विचाराने मोबाईल अपच्या माध्यमातून नियमितपणे विविध विषयाचे पीडीएफ पुस्तके, युट्युब लिंक्स, स्वत: युट्युब वर अपलोड केलेली काही व्याख्याने, आॅडिओ बुक्स, आॅडिओ रेकॉर्डिंग तसेच विविध वेबसाईट्सच्या लिंक पाठविल्या जात आहेत.
आॅनलाइन क्लासद्वारे साधताय संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 22:04 IST