लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहर व परिसरात बुधवारी दुपारी व सायंकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच नेर व म्हसदी परिसरातही जोरदार पाऊस झाला. गेल्या बऱ्याच दिवसापासून दडी मारलेल्या वरुणराजाने हजेरी लावल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले.नेरसह परिसरात जोरदारनेर- धुळे तालुक्यातील नेरसह परिसरात दिवसभर उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. बुधवारी सायंकाळी ४ वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाला. यामुळे पिकांना मोठा फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला.नेरसह परिसरात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पिकांना पावसाची गरज होती. शेतकºयांनी पिकांची मशागत केल्याने खत देण्यासाठी पावसाची आवश्यकता होती. त्यामुळे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. बुधवारी दोन ते तीन तास जोरदार पाऊस झाल्याने पिकांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे पुन्हा शेतीच्या कामांना गती येणार आहे.म्हसदी परिसरात एक तास पाऊसम्हसदी- परिसरात दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एक तासापर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अचानक दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले होते. त्यामुळे वातावरणात उकाडा निर्माण झाला होता. अशातच दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. तसेच वेळेवर पाऊस आल्यामुळे शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले.गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. मात्र या पावसामुळे शेतकरी वर्गाला धीर आला आहे. परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे कापूस, मका, तुर, भुईमुग बाजरी, फळबाग आदी पिकांना जीवदान मिळाले आहे. यामुळे शेतकरी समाधानी झाले असून कोळपणी, खुरपणी, निंदणी आदी आंतर मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
धुळे, नेर, म्हसदी परिसरात जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 13:00 IST