बसलेले प्रकाश चौधरी, विजय तावडे, रघुनाथ बैसाने, सुहास साठे, दत्तात्रय हाफसे, सुखदेव भोई, सीताराम भोई, रतीलाल जाधव, उत्तम पाटील, अविनाश ठाकुर, नवल ठाकुर या कर्मचाऱ्यांशी आमदार जयकुमार रावल आणि नगराध्यक्ष नयनकुंवर रावल यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष प्रवीण महाजन, माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम, अभियंता शिवनंदन राजपूत या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यानंतर, सकारात्मक निर्णय घेऊन लिंबूपाणी देऊन उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडविण्यात आले.
दोंडाईचा नगरपालिका निवृत्त कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र शासनाकडे सेवा उपदान, हक्काची रजा, ६व्या व ७व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम असे जवळपास ६ कोटी रक्कम शिल्लक आहे. शासन दरवेळी सहायक अनुदानाची रक्कम कपात करूनच देत असते. त्यामुळे दिवसेंदिवस कर्मचाऱ्यांचे देणे वाढतच आहे. त्यासाठी शासनाने लवकरात लवकर थकलेली रक्कम दोंडाईचा नगरपालिकेस अदा करावी, जेणेकरून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वृद्धापकाळात आरोग्यासाठी किंवा कुटुंबातील इतर गरजा पूर्ण करता येतील, तसेच नगरपालिकेच्या फंडातून दरवर्षीच्या वसुलीतून किमान १०% रक्कम बाजूला काढून कर्मचाऱ्यांना देण्यात येतील. अशा प्रकारचा ठराव करण्यात येऊन शासनाकडून थकीत अतिरिक्त सहायक अनुदानाची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात इ. शासनाच्या मंत्र्यांकडे आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल.