धुळे : केंद्र शासनाचा दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ चे कलम ८९, ९२ अ आणि ९३ या कलमांची अंमलबजावणी करण्याची मागणी प्रहार अपंग क्रांती संस्थेने केली आहे़प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत सूर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्षा इंदू क्षिरसागर, शहराध्यक्षा अॅड़ कविता पवार यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले़निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासन दिव्यांग हक्क अधिनियमात सुधारणा करण्याचा प्रयत्न होता़ परंतु प्रहार अपंग क्रांती संस्था व इतर संघटनांनी तीव्र विरोध केला़ त्यामुळे शासनाने कायद्यामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव मागे घेतला़ अपंग बांधवांच्या एकतेचा विजय झाला़ असे असली तरी या अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी होत असल्याचे दिसत नाही़ पोलीस विभागाला या अधिनियमाची पूरेशी माहिती नाही़त्यामुळे सर्व शासकीय विभागांची कार्यशाळा आयोजित करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे़
दिव्यांग हक्क अधिनियमाची अंमलबजावणी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 22:31 IST