दोंडाईचा : माझी वसुंधराची जबाबदारी सर्वांची आहे. शरीर व पर्यावरण संतुलनसाठी सायकल चालविणे महत्वाचे आहे. शरीर स्वास्थसाठी सायकल चालविणे गरजेचे असून दैनंदिन जीवनात सायकलीचा वापर वाढवायला हवा़ प्लास्टिक वापर करू नका, बाजारात जातांना कॅरी बॅगची मागणी न करता घरून कापडी पिशवी घेऊन जा. लहान लहान गोष्टीमधून वसुंधरेचे संरक्षण होईल म्हणून सायकल वापरा असे आवाहन दोंडाईचा पोलीस स्टेशनचे परिक्षाविधीन आय पी एस अधिकारी पंकज कुमावत यांनी दोंडाईचा येथे केले.दोंडाईचा नगरपालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत माझी वसुंधरा अभियानात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीस हिरवा झेंडा दाखवून परिक्षाविधीन आय पी एस अधिकारी पंकज कुमावत यांनी उदघाटन केले. सायकल रॅलीत दोंडाईचा नगरपालिका मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम, भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन, आरोग्य सभापतीचे सहाय्यक जितेंद्र गिरासे, माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, दोंडाईचा हौशी सायकलीस्टचे राजन मोरे, प्रितम भावसार, परिमल कौटुंरवार, महेंद्र बावीस्कर, भाजप कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते कृष्णा नगराळे, भरतरी ठाकुर, हितेंद्र महाले, चिरंजीवी चौधरी, युसुफ कादीयानी, उपमुख्याधिकारी हर्षल भामरे, आरोग्य निरीक्षक शरद महाजन, रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया, लायन्सचे अध्यक्ष हमजा जिनवाला, राकेश अग्रवाल, सुनिल शिंदे आदींसह नगरपालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरीर व पर्यावरण संतुलनसाठी सायकल चालवा : पंकज कुमावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 22:30 IST