मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे नागरिकांना व ग्रामपंचायत प्रशासन तसेच कोविड १९ समितीला कोरोनाचा विसर पडला असुन सर्व आलबेल सुरू आहे. लग्न समारंभ व अत्यंविधीसाठी घालुन दिलेले नियम केवळ कागदावर शिल्लक आहेत.अशात जिल्हा व राज्यात वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता वेळीच सावध पवित्रा व नियमांचे पालन करणे तसेच प्रशासनाने घालुन दिलेल्या नियमांची गावात योग्य अंमलबजावणी होत आहे की नाही यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा कोरोनाचा उद्रेक होवुन संपुर्ण गावाचे आरोग्य धोक्यात येण्याची भिती निर्माण झाली आहे. मालपूर हे तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे गाव आहे. साहजिकच वर्दळ दिवसभर कायम दिसुन येते मात्र नागरिकांच्या तोंडावर मास्क दिसुन येत नाही. सरकारी कार्यालयात बँकेत सोशल डिस्टन्सिंग राखले जात नाही. भाजीपाला विक्री ठिकाणी व सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी आदी ठिकाणी नेमून दिलेल्या नियमांचे पालन होत नाही़ यासाठी कोरोना संसर्गाचा पुनश्च निर्माण झालेला वेग लक्षात घेता ग्रामपंचायत प्रशासन व कोविड १९ समितीने वेळीच सावध पवित्रा घेणे आवश्यक असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मालपूर परिसरातील नागरीकांना कोरोनाचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 22:11 IST