धुळे : येथील मोगलाईतील फुले नगरमधील तरुणाचा खून प्रकरणी संशयितांना अटक केल्यामुळे समधान व्यक्त करीत पोलिसांच्या या तपास कामाचे भोई समाज महासंघाने कौतुक केले आहे़ महासंघाचे अध्यक्ष गणेश मोरे, सचिव वसंतराव तावडे, तालुकाध्यक्ष भटू गोपिनाथ भोई यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, एलसीबी पीआय शिवाजी बुधवंत यांचा सत्कार केला़ या गुन्ह्याचा तपास लावण्याची मागणी महासंघाने केली होती़
पोलिसांच्या कामाचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 21:03 IST