धुळे : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्याच्या अलिकडे एका हॉटेलसमोर शनिवारी राहुल मैंद या मोहाडीच्या तरुणाच्या खूनप्रकरणी ६ जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे़कोणत्यातरी कारणावरुन दोन गटात गेल्या काही दिवसांपासून धुमश्चक्री सुरु असताना त्यांच्यातील वैमनस्य अधिकच वाढले़ अशातच शनिवारी दुपारी मोहाडीत राहणारा तरुण राहुल उर्फ राजू मैंद हा मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्याच्या अलिकडे एका हॉटेलवर थांबलेला असताना त्याचवेळेस एका १५ ते २० जणांच्या जमावाने हातात धारदार शस्त्र, गावठी कट्टा घेऊन त्याच्यावर हल्ला केला होता़ त्याच्या डोक्याला आणि अन्य ठिकाणी शस्त्राने वार केल्याने गंभीर अवस्थेत राजू याने पळ काढला़ जखमी अवस्थेत असलेल्या राजूने अवधान एमआयडीसी जवळील नाल्याकडे धाव घेतली असता तिथेही या जमावाने धाव घेत त्याच्यावर पुन्हा शस्त्राने हल्ला करीत त्याच्यावर गोळीही झाडली आणि त्याला ठार मारले़या घटनेनंतर मारेकऱ्यांनी पळ काढला होता़ घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती़ घटनास्थळावरुन काही पुरावे संकलित करण्यात आले आहेत़ मोहाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाला गती देण्यात आली होती़ मारेकºयांच्या शोधासाठी पथक देखील पाठविण्यात आले होते़ अशातच पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे़ त्यात दीपक राजू कोळी (२२, रा़ रामनगर, मोहाडी उपनगर), चॅम्पियनसिंग मिलनसिंग भादा (१९, रा़ १५० खोली वनश्री कॉलनी, मोहाडी उपनगर), सुनील रमेश जाधव (२३, रा़ पिंपळादेवी, मोहाडी उपनगर), संजय उर्फ सनी राजेंद्र थोरात (२४, रा़ म्हाडा अपार्टमेंट, हॉटेल रेन्सीडेन्सीच्या मागे, मोहाडी उपनगर), राहुल विनायक बाविस्कर (२१, रा़ शिवानंद कॉलनी, पंचमुखीसमोर, मोहाडी उपनगर), मिनाल उर्फ मोहीत राजेंद्र मनहास (१९, रा़ शिवानंद कॉलनी, मेहबूब सुबानी जवळ, मोहाडी उपनगर) या संशयितांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे़पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक संगिता राऊत आणि त्यांचे पथक अटकेतील संशयितांची कसून चौकशी करीत आहेत़
तरुणाच्या खूनप्रकरणी ६ जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 22:23 IST