उस्मानाबाद शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा संरक्षण कठडा व मेहता इंजिनिअरिंग कंपनीचे दुकान यामधील रस्त्याची रूंदी मोजणे, रस्त्याचे डांबरीकरण मोजणे व रस्त्याची साईडपट्टी मोजून अतिक्रमणमुक्त करणे, कसबे तडवळा येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाला गती देणे आदी मागण्यांसाठी संविधान न्याय-अधिकार संवर्धन संघर्ष समिती वारंवार पाठपुरावा करीत आहे. परंतु, प्रशासन याची कुठलीच दखल घेत नसल्याचे हे आंदोलन करण्यात आल्याचे समितीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
यावेळी संघर्ष समितीचे मार्गदर्शक रणजीत गायकवाड, जागृती फौंडेशनचे अध्यक्ष विजय अशोक, आदिनाथ नवनाथ सरवदे, सोमनाथ यशवंत गायकवाड, मुकेश मोठे, बाबासाहेब कांबळे, ग्रामपंचायत सदस्य उमाजी गायकवाड, रोहित कदम, रोहित गायकवाड, बाप्पा शिंदे, भोसले, उमेश सिरसाठे, रावसाहेब मस्के, अतुल लष्करे, फुले-शाहू-आंबेडकर बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे जयशील भालेराव, बाबासाहेब भालेराव, सूरज भालेराव, संताजी निकाळजे, सिध्दार्थ निकाळजे, अमित धावारे, राहुल भालेराव, प्रसेनजीत सोनवणे, प्रशांत सोनवणे, श्रीकांत गायकवाड आदी उपस्थित होते.