पेठसांगवी : उमरगा तालुक्यातील पेठसांगवी ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा काँग्रेसचे माजी सरपंच गणेश पाटील यांच्या गटाच्या पॅनलने वर्चस्व मिळवले. या ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी निवडणूक झाली. यातील एक जागा निरंक राहिली असून, चार उमेदवार बिनविरोध निघाले. या निवडणुकीत गणेश पाटील गटाने नऊ जागा ताब्यात घेतल्या तर विरोधी श्रीमंत सुरवसे व संजय माळी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला तीन जागा मिळाल्या. विजयी व बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये संजय माळी, दत्तात्रय राऊत, गिरमल दलाल, शीतल सुरवसे, सुप्रिया बालापुरे, मिलिंद सुरवसे, पार्वती कांबळे, सिराज शेख, मीनाक्षी राठोड, कोशर शबीर मुजावर, प्रभावती शिंदे, सुमन सुभेदार यांचा समावेश आहे. निवडीनंतर विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच गणेश पाटील, प्रकाश सुभेदार, श्रीमंत सुरवसे, संजय माळी, राजेंद्र पाटील, हरिभाऊ भोसले, नागनाथ यमगर, ताहेर शेख, अनंत माळी, सिराज पठाण, मुकेश बालापुरे, शबीर मुजवर, नेताजी सुभेदार, अमर यमगर, गेमराज राठोड, रज्जाक शेख, ज्योतीबा कांबळे आदी उपस्थित होते.