पोलिसांनी सांगितले, सारोळा- वाशी येथील श्रीकांत बापूराव कवडे (वय ५७) यांचा मृतदेह गावात पडल्याची माहिती पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना मिळाली. यावरून त्यांनी सारोळा येथे जाऊन पाहणी केली असता मृताच्या घरासमोर हा मृतदेह आढळला. त्याला कोणी मारहाण केली, अशी चौकशी पोलिसांनी सुरू केली. मात्र, कुणी काहीच बोलत नव्हते. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला असून, रात्री ९ च्या सुमारास वैद्यकीय अधिक्षक कपिल पाटील व वैद्यकिय अधिकारी दत्ता तपसे शविवच्छेदन करत होते. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी एकास ताब्यात घेतले असून, खुनाचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मारहाणीत एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:30 IST