उस्मानाबाद : शहरातील शासकीय तंत्रनिकेतन येथील कोविड सेंटरमध्ये मास्क, सॅनिटायझरसह दैनंदिन वापराच्या वस्तूंचे वाटप प्रा. विशाल बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कोरोनामुक्तीसाठी मास्क, सॅनिटायझचा नियमित वापर करण्याची शपथ यावेळी देण्यात आली.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, कोविड सेंटरमध्ये उपचारांखालील रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रा. विशाल बनसोडे यांच्या वतीने शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मास्क, सॅनिटायझर, कपड्याचे साबण, अंघोळीचे साबण, काथ्या, बकेट, कपडे धुण्याचा ब्रश, टॉयलेट साबण, प्रिंटआऊट पेपर, हॅन्डवॉश, ग्लास, पाण्याचा जग, अशा विविध वस्तूंचे वाटप प्रा. बनसोडे, पवन गायकवाड, अक्षय बावस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोरोनामुक्तीची शपथ सर्वांना देण्यात आली. प्रा. बनसोडे यांच्या या कार्याचे कोविड सेंटरमधील रुग्णांनी कौतुक केले.