तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील काटी ग्रामपंचायतीला ग्रामविकास विभागाच्यावतीने दिला जाणारा आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार मिळाल्याबद्दल रविवारी गुरुजी विचार मंच व रुक्मिणी फाउंडेशनच्यावतीने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
तालुका व जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार या ग्रामपंचायतीने मिळविला आहे. याबद्दल सरपंच आदेश कोळी, उपसरपंच शामलताई हंगरगेकर, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य मोतिराम आगलावे होते. जिल्हा निवड, पुरस्कारप्राप्त निधीसह शासकीय विकास योजनांच्या निधीचा योग्य विकासाभिमुख विनियोग करून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविण्यासाठी आम्ही लोकसहभागातून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सरपंच आदेश कोळी यानी यावेळी दिली.
सूत्रसंचालन सहशिक्षक पंकज काटकर, प्रास्ताविक सहशिक्षक रवींद्र देशमुख यानी केले. आभार अनिल हंगरकर यांनी मानले. यावेळी माजी अध्यक्ष सयाजीराव देशमुख, अध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, प्रा. अभिमान हंगरकर, उमाजी गायकवाड, सुजित हंगरगेकर, रावसाहेब देशमुख, शामराव आगलावे, सूर्यभान हंगरकर, करीम बेग, प्रा. भारत गुरव, अशोक जाधव, अतुल सराफ, ग्रा. पं. सदस्य मकरंद देशमुख, जितेंद्र गुंड, सुहास साळुंके, हेरार काझी, अनिल बनसोडे, अविनाश वाडकर, भैरी काळे, सतीश देशमुख, शिवलिंग घाणे, संजय महापुरे, संजोगता महापुरे, प्रज्ञा साळुंके, भामाबाई घाणे, हाजीबेगम काझी, गुरुजी विचार मंचचे रवींद्र देशमुख, बाळासाहेब हंगरगेकर, दयानंद जवळगावकर, अनिल हंगरकर, सोमनाथ जामगावकर, पंकज काटकर, हर्षवर्धन माळी, बापू काळे, प्रशांत चव्हाण, भागवत गुरव, नागनाथ रोडे, वसंत चव्हाण, विलास देशपांडे, पंकज काटकर, जुबेर शेख, ग्रा. पं. कर्मचारी प्रशांत सुरवसे, दत्ता छबिले, विलास सपकाळ, अनिल बनसोडे, सविता बनसोडे, पोपट बोराडे आदी उपस्थित होते.