प्राजक्ता चव्हाण हिची निवड
अणदूर : तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथील शेतकरी कुटुंबातील प्राजक्ता सुरेश चव्हाण हिची आसाम रायफल फाेर्समध्ये नुकतीच निवड झाली आहे. शेतकरी कुटुंबातील हालाखीच्या परिस्थितीचा सामना करून यश मिळविल्याबद्दल प्राजक्ताचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.
खराडे यांचे यश
लाेहारा : तालुक्यातील माकणी येथील बी.एस.एम. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील सहयाेगी प्राध्यापक आर. एम. खराडे यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने हिंदी विषयासाठी नुकतीच पीएच.डी. प्रदान केली आहे. प्रा. डाॅ. देविदास इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाेध प्रबंध सादर केला हाेता. यशाबद्दल त्यांचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.
सेवानिवृत्तीनिमित्त घुले यांचा सत्कार
कळंब : जनजागृती माध्यमिक विद्यालयाच्या वतीने सेवानिवृत्तीनिमित्त सरस्वती गुले यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. श्री संत ज्ञानेश्वर बालिकाश्रम येथे सदरील कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित हाेते. यावेळी मुख्याध्यापक आर. बी. चंदनशीव, दीपक गाेडसे, बाबूराव पाखरे आदींची उपस्थिती हाेती.
रूईभर-अनसुर्डा रस्त्याच्या कामास मंजुरी
उस्मानाबाद : तालुक्यातील रूईभर-अनसुर्डा या साडेआठ किमी रस्त्याच्या कामास प्रधानमंत्री ग्रामसडक याेजनेतून मंजुरी मिळाली आहे. या रस्त्यासाठी ७६७.५१ लाख रुपये मंजूर झाले आहेत. यासाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य रामदास काेळगे यांनी सातत्याने पाठपुरावा केला हाेता. निधी मंजूर झाल्यामुळे ग्रामस्थांची गैरसाेय दूर हाेणार आहे.
अैवध दारूविक्री बंद करण्याची मागणी
मुरूम : शहरातील अवैध दारूविक्रेत्यांवर कठाेर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने ३ एप्रिल राेजी करण्यात आली. निवेदनावर फेडरेशनचे शहराध्यक्ष सागर धुमुरे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष गाेविंद साेबाजी, गणेश शिंदे, मंथन अंबर, जगदीश राठाेड, जन्मेजय कांबळे, बंडू ब्याळे, प्रकाश फनेपुरे, मारुती कदम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.