उस्मानाबाद जिल्ह्यातील एका गावातील ही हकिकत आहे. गावातील आरोपी तरुणाने एका २० वर्षीय तरुणीसोबत ओळख वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. हे प्रकरण इतके वाढत गेले की तब्बल वर्षभर हे दोघे शरीर संबंधात होते. यासाठी लग्नाची अट ठेवल्यानंतर प्रियकराने ती मान्यही केली होती. मात्र, वर्ष उलटून गेल्यानंतरही तो लग्नाचे नाव घेईना. नंतर तर स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यामुळे व्यथित झालेल्या तरुणीचे कुटुंबीयांनी अन्यत्र मुलगा शोधून तिचे लग्न जमविले. याला काही दिवसही उलटत नाहीत तोच आरोपी प्रियकर पुन्हा तिच्याकडे प्रकटला. सोबत त्याचे कुुटुंबीयही होते. या सर्वांनी तरुणीच्या भावी पतीस प्रेमसंबंधांची माहिती देऊन लग्न मोडतो, अशी धमकी देत मारहाण केली. शिवाय, ठार मारण्याची धमकीही दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने अखेर पोलीस ठाणे गाठले अन् जुन्या प्रियकराविरुद्ध तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी लैंगिक अत्याचार, तसेच मारहाण धमकीच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
लग्न मोडण्याची धमकी देत प्रियकराची तरुणीला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST