जिल्ह्यात आता दररोज सरासरी अडीचशे कोरोना बाधित आढळून येत आहेत. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने २८ मार्च रोजी एक आदेश काढून कोरोना संसर्गास प्रतिबंध घालण्यासाठी चहा हॉटेल व्यवसायिक, पान टपरी आदी छोट्या व्यवसायांवर निर्बंध आणले आहेत. दरम्यान, खा.ओम राजेनिंबाळकर यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन हे निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली आहे. छोटे-मोठे असे व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांची अडचण झाली आहे. त्यांना या जाचक अटीतुन बाहेर काढून इतर व्यापाऱ्यांप्रमाणे व्यवसायास मुभा द्यावी. निर्बंधाच्या परिपत्रकामध्ये अंशत: बदल करुन नियमांच्या अधिन राहून खाजगी कोचिंग क्लासेस, खानावळ व हॉटेल्स ५० टक्के उपस्थितीत सुरु करण्याची तसेच ठराविक वेळेत व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे खासदार राजेनिंबाळकर यांनी केली आहे.
हॉटेल, टपऱ्यांना परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:33 IST