येडशी : येथील रस्त्यावरील अतिक्रमण काढून शेतकऱ्यांना रस्ता खुला करुण देण्यात प्रशासनाला यश आले. येथे गाव तलाव-गव्हार वस्ती ते रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या दीड किलोमीटर रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते. प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांची सहमती घेऊन वीस फूट रुंदीचा हा रस्ता तयार करण्याच्या कामाचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला. यासाठी मंडळ अधिकारी एन. डी. नागटिळक, तलाठी बालाजी गरड, जब्बार पटेल, विष्णू कासट, महेबूब बागवान, हरिभाऊ गव्हार, दिलीप गव्हार, प्रभाकर गव्हार, विलास गव्हार, पांडुरंग येलकर, तानाजी धुमाळ, एकनाथ गव्हार, दादा शिंदे व शेतकऱ्यांनी प्रयत्न केले.
‘सुंदर गाव’ अभियानास प्रारंभ
(फोटो : बीबीसी जळकोट २०)
नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील स्मार्ट ग्रामपंचायत आलियाबाद येथे ‘माझं गाव सुंदर गाव’ या ग्रामस्वच्छता अभियानास जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी गावातील सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी सरपंच ज्योतीका चव्हाण, उपसरपंच सूर्यकांत राठोड, ग्रामपंचायत सदस्य रेखा चव्हाण, अमृता चव्हाण, सीताराम राठोड, थावरू राठोड, शिवाजी पोलीस पाटील, शिवाजी चव्हाणांनी, पांडुरंग चव्हाण, बालू राठोड, हरिश्चंद्र जाधव , गोविंद जाधव, हरिश्चंद्र चव्हाण, मनोज पवार, रतन चव्हाण, शांताबाई राठोड, शानूबाई चव्हाण, नवसाबाई राठोड, रिना चव्हाण, रेश्मा चव्हाण, ग्रामविकास अधिकारी प्रशांत भोसले आदी उपस्थित होते.
दहिफळ येथे स्वच्छता अभियान
(फोटो : श्रीकांत मडके २०)
मोहा : कळंब तालुक्यातील दहिफळ येथील ग्रामपंचायतीच्या वतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत ‘स्वच्छ गाव सुंदर गाव अभियान’ राबविण्यात आले. यावेळी गावातील मुख्य बाजार मैदान, खंडोबा मंदिर परिसर, महादेव मंदिर परिसर, गावात जाणारा मुख्य रस्ता येथे स्वच्छता करण्यात आली. ग्रामपंचायत सरपंच चरणेश्वर पाटील, उपसरपंच अभिनंदन मते, ग्रामविकास अधिकारी हनुमंत झांबरे, दत्ता मते, विलास काळे, बाबासाहेब भातलवंडे, सदाशिव मते, समाधान मते, मनेश गोरे, बापू मते, प्रवीण पाटील, अच्युत मते, ज्ञानदेव मते, दगडू कांबळे, वसंत धोंगडे, नामदेव खंडागळे, उपसरपंच अभिनंदन मते, रंजित काकडे, बालाजी गोरे, शिपाई संतोष उपळकर, अनंत मते आदींनी यात सहभाग घेतला.
भाजपा लढविवणार स्वबळावर निवडणूक
(फोटो : बालाजी बिराजदार २०)
लोहारा : येथील नगरपंचायत निवडणूक भाजप स्वबळावर लढविणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांनी दिली. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील भारतमाता मंदिरात गुरुवारी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मराठवाडा संघटन मंत्री संजय कोडगे, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी यावेळी पं. स. सदस्य वामन डावरे, नगरसेवक आयूब शेख, शिवशंकर हत्तरगे, प्रशांत लांडगे, दगडू तिगाडे, इकबाल मुल्ला, प्रशांत काळे, दादा मुल्ला, नेताजी शिंदे, प्रमोद पोतदार, शंकर मुळे, जयेश सूर्यवंशी, राजशेखर माणिकशेट्टी, मल्लीनाथ फावडे, कल्याण ढगे, प्रतीक गिरी, शिवा नारायणकर, दयानंद फरिदाबादकर, विजय महानूर, पिंटू जट्टे, पिंटू कमलापुरे, काशीनाथ घोडके यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
‘मी रमाई बोलते’ एकपात्री प्रयोगाला प्रतिसाद
(फोटो : उन्मेष पाटील २०)
कळंब : शहरातील समतानगर येथील तथागत बुद्ध विहारात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंतीनिमीत्त ‘मी रमाई बोलतेय' या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. यास चांगला प्रतिसाद मिळाला.
वैभवी कांबळे यांनी ‘मी रमाई बोलतेय’ या एकपात्री प्रयोगातील अभिनयातून त्यागमूर्ती रमाईंच्या जीवनाचे दर्शन घडविले. विकाराचे हरण विहारच करू शकते. यासाठी विहाराकडे या हे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी धम्मसेवक प्रा. विलास घारगावकर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सागर कांबळे, सूत्रसंचालन अतुल गायकवाड यांनी केले. आभार विशाल धावारे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन हेनागरबाई वाघमारे, अनिता कांबळे, लता आवाड, सुकशाला गजधने, छाया धावारे यांनी केले होते