जुगार अड्ड्यावर छापा, गुन्हा दाखल
उस्मानाबाद -शहरातील एका पत्र्याच्या खाेलीत सुरू असलेेल्या जुगार अड्यावर आनंदनगर पाेलीस ठाण्याच्या पथकाने ५ एप्रिल राेजी अचानक छापा मारला. या कारवाईत जुगाराच्या साहित्यासह राेख १३ हजार २३० रूपये जप्त करण्यात आले. या प्रकरणी राहुल गुळवे, विजय मसे, साेमनाथ चपनेयांच्याविरूद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.
विवाहितेचा विनयभंग, एकाविरूद्ध गुन्हा
उस्मानाबाद - जिल्ह्यातील एका गावातील शिवारात ५ एप्रिल राेजी नांगरणी सुरू असताना गावातीलच तरूणाने नांगरणीस विराेध केला. तसेच विवाहितेस बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर जिवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.
महिला प्रवाशाचे २ हजार लंपास
उस्मानाबाद -येथील बसस्थानकात थांबलेल्या बसमध्ये चढत असताना जहीरून्नीसा शेख या महिलेच्या पर्समधील राेख २ हजार रूपये अज्ञाताने लंपास केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेख यांनी आनंदनगर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरूद्ध चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.
४ लाखांची ऑनलाईन फसवणूक
उस्मानाबाद -तुमच्या खात्यात ४ लाख १० हजार २९५ रूपये वर्ग करण्यात आले आहेत, असा संदेश श्रीनिवास तांबारे (रा. कळंब) यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर ३ एप्रिल राेजी आला. यावर तांबारे यांनी त्या संदेशातील लिंग उघडून त्यात आपल्या बॅंकखात्याची माहिती व पासवर्ड भरले असता, साेळा व्यवहारात ४ लाख १० हजार २९५ रूपये अन्य खात्यात स्थलांतरित करण्यात आले. या प्रकरणी अज्ञाताविरूद्ध कळंब पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेवळी येथे घरफाेडी, दागिने लंपास
उस्मानाबाद -लाेहारा तालुक्यातील जेवळी येथील नितीन कटारे यांच्या घराचे कुलूप ताेडून अज्ञाताने आतील १८ ग्रॅम साेन्याचे दागिने व राेख ३० हजार रूपये चाेरून नेले. ही घटना ५ ते ६ एप्रिल या कालावधीत घडली. या प्रकरणी अज्ञाताविरूद्ध लाेहारा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.
किनी येथून दुचाकी पळविली
उस्मानाबाद -तालुक्यातील किनी येथील अक्षय शिंदे यांनी आपली दुचाकी घरासमाेर उभी केली हाेती. अज्ञाताने २ एप्रिलच्या पहाटे सदरील दुचाकी लंपास केली. सर्वत्र शाेध घेऊनही दुचाकी मिळून आली नाही. त्यामुळे शिंदे यांनी ढाेकी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली असता, अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.
निष्काळजीपणे अग्नी प्रज्वलीत केला
उस्मानाबाद -परंडा येथे राजेश शिंदे व अंबुज लटके यांनी मानवी जिवीतास धाेका हाेईल, अशा पद्धतीने खानावळीत अग्नी प्रज्वलीतकेला. या प्रकरणी संबंधित दाेघांनाही प्रत्येकी १ हजार रूपये दंडाची शिक्षा परंडा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ६ एप्रिल राेजी सुनावली.