आयपीएल २०२६ स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात भारतीय क्रिकेटमधील प्रतिभावंत चेहऱ्यांची खास झलक पाहायला मिळत आहे. यंदाचा हगाम गाजवणाऱ्या अनेक चेहऱ्यांना लकवकर मेगा लॉटरी लागणार आहे. कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एकाच वेळी टीम इंडियाचे दोन संघ मैदानात उतरवण्यासाठी मेगा प्लॅन आखला आहे. यासाठी ३०-३५ संभाव्य खेळाडूंची यादीही तयार करण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बीसीसीआयचा मेगा प्लॅन; एकाच वेळी दोन संघ उतरवणार मैदानात
NDTV नं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, "आशियाई क्रीडा स्पर्धा आणि भारत विरुद्ध वेस्टइंडिज यांच्यातील द्विपक्षीय टी-२० मालिका एकाच वेळी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआय टीम इंडियाचे दोन वेगवेगळ्या स टी-२० संघांची बांधणी करणार आहे. यासाठी ३०-३५ क्रिकेटर्संची संभाव्य यादीही तयार करण्यात आली आहे.
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
IPL मधील या खेळाडूंवर असतील निवडकर्त्यांच्या नजरा
बीसीसीआयच्या या मेगा प्लॅनमुळे आयपीएल स्पर्धेत खास छाप सोडणाऱ्या यशस्वी जैस्वालसह वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्य, अंगकृष्ण रंघुवंशी आणि आयुष बडोनी या खेळाडूंची टीम इंडियात एन्ट्री होऊ शकते. गोलंदाजांमध्ये रवी बिश्नोई प्रसिद्ध कृष्णा आणि कार्तिक त्यागी यांनाही संधी मिळू शकते.
श्रेयस अय्यरच्या खांद्यावर नेतृत्वाची धूरा
विकेट किपर बॅटरच्या रुपात ध्रुव जुरेल हा प्रबळ दावेदार मानला जात आहे. IPL मध्ये आपल्या नेतृत्वाची झलक दाखवून देणारा श्रेयस अय्यर टीम इंडियाचा कर्णधार होणार हे निश्चित मानले जात आहे.