सारा -शुबमन यांच्या प्रेमाची पुन्हा रंगली चर्चा; सचिन तेंडुलकरच्या मुलीकडून युवा फलंदाजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Shubhman Gill Birthday, Sara Tendulkar : यापूर्वीही अनेकदा सोशल मीडियावरून रंगल्या होत्या चर्चा.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 11:47 PM2021-09-08T23:47:12+5:302021-09-08T23:48:19+5:30

Sara Tendulkar extends birthday wishes to Shubman Gill as he turns 22 social media | सारा -शुबमन यांच्या प्रेमाची पुन्हा रंगली चर्चा; सचिन तेंडुलकरच्या मुलीकडून युवा फलंदाजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सारा -शुबमन यांच्या प्रेमाची पुन्हा रंगली चर्चा; सचिन तेंडुलकरच्या मुलीकडून युवा फलंदाजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Next
ठळक मुद्देयापूर्वीही अनेकदा सोशल मीडियावरून रंगल्या होत्या चर्चा.

भारतीय संघाचा युवा खेळाडू शुबमन गिल (Shubman Gill) याचा बुधवारी २२ वा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्तानं शुबमन गिलवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. सोशल मीडियावरही त्याला अनेक चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. शुभमन गिलच्या या शुभेच्छांमध्ये चर्चेचं ठरलं तो म्हणजे सारा तेंडुलकरचा मेसेज. 

आपल्या वाढदिवलाच्या दिवशी शुबमन गिल आपल्या फॅन्सशी इंटरअॅक्ट करण्यासाठी सोशल मीडियावर लाईव्ह आला होता. त्याच वेळी सारा तेंडुलकरनंही त्याला विश केलं. यानंतर त्यांच्या सोशल मीडियावर त्याचा स्क्रिनशॉट व्हायरल झाला आणि त्यांच्या प्रेमाची पुन्हा नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगू लागली. लाईव्ह सेशनदरम्यान सारानं शुबमनला "HBDDDDDD," असं म्हणत शुभेच्छा दिल्या. तिच्या याच मेसेजनं नेटकऱ्यांचंही लक्ष खेचलं.

 

यापूर्वीही रंगली होती चर्चा 
शुबमनचं नाव सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar) हिच्याशी जोडलं जात आहे. काही महिन्यांपूर्वी गुगल या सर्च इंजिनवर शुबमन गिलची पत्नी म्हणून सारा तेंडुलकरचं नाव दाखवलं जात होतं. WTC फायनलपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत शुबमननं आपण सिंगल असल्याचे सांगून या चर्चांना पूर्णविराम लावला होता. मात्र, आता या दोघांच्या नात्याची पुन्हा चर्चा सुरू झाली होती.

शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर इंस्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करतात. इतकंच नव्हे तर एकमेकांच्या पोस्टला लाईक्स व इमोजीही पोस्ट करतात. सारानं अनेकदा इंस्टा स्टोरीवर शुबमन खेळतानाच फोटो पोस्ट केले आहेत. शुबमन साराच्या कुटुंबीयातील सर्व सदस्यांना फॉलो करतो आणि यात आश्चर्य वाटण्यासाठी कोणतीच बाब नाही.

Web Title: Sara Tendulkar extends birthday wishes to Shubman Gill as he turns 22 social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app