अंबड : कर्जाची परतफेड वेळेवर न केल्याने जामिनदारांना नोटिसा बजावल्याचा राग आल्याने या जामिनदारांनी कर्जदारालाच पळवून नेल्याची घटना अंबड येथे रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी अपहृत कर्जदाराने आरोपींच्या ताब्यातून सुटका मिळवून पोलिसांत तक्रार नोंदविली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अंबड येथील महेंद्र सूर्यकांत शिलवंत यांनी महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाकडून काही वर्षांपूर्वी कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड वेळेवर न केल्याने महामंडळाने चार जामिनदारांना नोटिसा बजावल्या होत्या. त्याचा जामिनदारांना राग आला. त्यामुळे मनोहर गवळी, सुभाष गवळी, हनुमंत गवळी, अभिमान गवळी या चार जणांनी महेंद्र शिलवंत यांचे १९ डिसेंबर रोजी अपहरण केले. मात्र आरोपींच्या ताब्यातून सुटका मिळवून रविवारी सकाळी महेंद्र हे अंबड पोलिस ठाण्यात दाखल झाले व त्यांनी फिर्याद नोंदविली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात वरील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबडमध्ये कर्जदारास जामिनदारांनी पळविले
By admin | Updated: January 19, 2015 00:55 IST