डेअरीच्या आड फरसाणची विक्री
औरंगाबाद: पुंडलिकनगर रोडवरील दूध डेअरींच्या आडून फरसाणची दिवसभरात अनेक तास विक्री होत असून त्याठिकाणी नागरिकांच्या होणाऱ्या गर्दीकडे गस्ती पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी व्यापारी करीत आहे. पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
खत बचत मोहिमेत सहभागाचे आवाहन
औरंगाबाद : रासायनिक खतांचा कमीत कमी व संतुलित वापर होण्याच्या उद्देशाने यंदाच्या खरीप हंगामात खत बचतीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये किमान १० टक्के रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी मे महिन्यात मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
विविध पदांची ऑनलाइन भरती
औरंगाबाद : भारतीय डाकच्या औरंगाबाद विभागातील (औरंगाबाद व जालना जिल्ह्याकरिता) ग्रामीण डाकसेवकांच्या पदांसाठी भर्ती ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे. याबाबतची माहिती डाक विभागाच्या संकेतस्थळावर २६ मेपर्यंत उपलब्ध आहे. शाखा डाकपाल ४८ पदे, सहायक शाखा डाकपाल १४ पदे, डाकसेवक ७ पदांसाठी भरती होणार आहे.