गंगाखेड: तालुक्यातील डोंगरगाव येथील २२ वर्षीय विवाहित महिलेने सासरच्या जाचास कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३१ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास केली. याप्रकरणी गंगाखेड पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डोंगरगाव येथील ज्योती मोहन सोडगीर यांना (वय २२) तू दिसण्यास चांगली नाहीस, तुला मूलबाळ होत नाही, माहेराहून एक लाख रुपये का आणत नाही? म्हणून शारीरिक व मानसिक त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून ज्योतीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात शिवाजी पोले (रा. अकोली ता. गंगाखेड) यांच्या फिर्यादीवरून मोहन गोपाळराव सोडगीर (पती), गोपाळ माधव सोडगीर (सासरा), चंद्रकला गोपाळ सोडगीर (सासू), लिंबाजी गोपाळ सोडगीर, विलास गोपाळ सोडगीर (भाया) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गंगाखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक जे. जे. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि सदानंद येरेकर पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)
जाचास कंटाळून महिलेची आत्महत्या
By admin | Updated: September 2, 2014 01:53 IST