बाळासाहेब स्वामी, ईटभूम-परंडा-वाशी विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल मोटे यांचे गिरवली हे गाव. या गावामध्ये शैक्षणिक सुविधांसोबतच अंतर्गत रस्ते, नाल्या, सभागृह आदी कामे झाली असली तरी ग्रामस्थांची पाणीटंचाईने पाठ सोडलेली नाही. गाव कायमस्वरूपी टंचाईमुक्त व्हावे, यासाठी एक -दोन नव्हे, तर तीन पाणीपुरवठा योजना राबविल्या. मात्र, एकही कामाची नाही. त्यामुळे उन्हाळा सुरू झाला की, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची चिंता भेडसावते. सध्या या ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याशिवाय गत्यंतर नाही.भूम तालुक्यातील गिरवली येथील आ. राहुल मोटे हे मागील भूम-परंडा-वाशी या मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत. सध्या त्यांची तिसरी ‘टर्म’ आहे. सदरील कार्यकाळात त्यांनी या छोट्याशा गावामध्ये आरोग्य उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, डीटीएड कॉलेज, डी. फार्मसी कॉलेज आणण्यासोबतच गावामध्येही सुमारे साठ लक्ष रूपये खर्च करून अंतर्गत पक्के रस्ते निर्माण केले आहेत. विवाह समारंभावेळी सर्वसामान्यांची गैरसोय होवू नये, म्हणून सभामंडपही उभारला आहे. परंतु, आजवर त्यांना पाणीटंचाईच्या जोखडातून गावाची कायमस्वरूपी मुक्तता करता आलेली नाही. टंचाई निवारणार्थ तीन योजना राबविण्यात आल्या. परंतु, शाश्वत स्त्रोत नसल्याने दोन योजना बंद अवस्थेत आहेत. सोन्नेवाडी प्रकल्पातील पाणीही पिण्यायोग्य नसल्याने आजही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट बघावी लागत आहे. त्याचप्रमाणे गावात स्मशानभूमीच्या शेडचा प्रश्नही मागील काही वर्षांपासून कायम आहे. स्मशानभूमीसाठी जागा असून शेडसाठी निधीही उपलब्ध झाला होता. परंतु, आजवर शेड उभे राहू शकले नाही. त्यामुळे पावसाळ्यामध्ये अंत्यविधीवेळी ग्रामस्थांना प्रचंड गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. अवघे दीडशे हेक्टर क्षेत्र बागायतीगिरवली परिसरातील लागवडीखालील क्षेत्र ५६१.२४ हेक्टर इतके आहे. त्यापैकी सुमारे ४१९.०९ हेक्टर क्षेत्र हे जिरायती आहे. तर बागायती क्षेत्र अवघे १४२.१५ हेक्टर इतके अत्यल्प आहे. प्राप्त आकडेवारीवर नजर टाकली असता बागायती क्षेत्रामध्ये फारशी वाढ झालेली नाही. यापुढे तरी सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी जानीवपूर्वक प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे. गाव हागणदारीमुक्त होईना !४मागील वीस वर्षांपासून गिरवली ग्रामपंचायतीची निवडणूक ही बिनविरोध होते. सातत्याने या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. असे असतानाही हे गाव हागणदारीमुक्त करण्यात येथील पदाधिकाऱ्यांना यश आलेले नाही. काँग्रेस सरकारच्या काळात आणि आता भाजपा सरकारकडूनही हागणदारीमुक्तीवर भर देण्यात येत असला तरी हे गाव सध्या अवघे ५० टक्के हागणदारीमुक्त झाल्याचे खुद्द ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले आहे. शंभर टक्के हागणदारीमुक्तीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे गावपुढारी सांगतात. जर आमदारांचे गावच हागणदारीमुक्त नसेल तर अन्य गावे कशी पुढाकार घेणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.गावामध्ये रस्ते, जलकुंभ, सभागृहसह आदी सोयी-सुविधा निर्माण झाल्या असून गावच्या विकासामध्ये आणखी भर टाकण्याच्या दृष्टिकोनातून सुसज्ज क्रीडांगण, व्यायामशाळा, नवीन महाविद्यालय सुरू व्हावे, अशी अपेक्षा ग्रामस्थ संजय मोटे यांनी व्यक्त केली.४टंचाई निवारणार्थ जवळपास तीन योजना राबविल्या. परंतु, त्या कुचकामी ठरल्या आहेत. त्यामुळे आता संगमेश्वर मध्यम प्रकल्पातून स्वतंत्र पाणी येजना राबवावी, अशी मागणी सतीश मोटे यांनी केली.४आ. राहुल मोटे यांच्या प्रयत्नांतून गावामध्ये विविध विकास कामे राबविण्यात आली आहेत. सध्या सौरपथदिवे बसविण्यात येत आहेत. तसेच गाव हागणदारी मुक्तीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे उपसरपंच प्रफुल्ला मोटे यांनी सांगितले.
गिरवलीकरांच्या नशिबी टँकरचे पाणी !
By admin | Updated: March 5, 2015 00:01 IST