शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचे संकट

By admin | Updated: April 9, 2016 00:36 IST

नांदेड : जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले असून तळपत्या उन्हात वाडी, वस्त्यावरील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

नांदेड : जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले असून तळपत्या उन्हात वाडी, वस्त्यावरील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेने पाणी टंचाई निवारणार्थ आतापर्यंत १९ कोटी ३८ लाख ८५ हजारांचा निधी खर्च केला आहे. दरम्यान, सध्या २८० टँकरने ग्रामीण भागात पाणीपुरवठा होेत आहे़ दुष्काळाच्या झळांनी ग्रामीण भागातील माणूस होरपळून निघाला आहे़ चैत्राचे उन्हं डोक्यावर घेऊन घोटभर पाण्यासाठी अबालवृद्ध रानोमाळ भटकत आहेत़ जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ पोटाची खळगी भरण्यासाठी हजारो माणसे शहराकडे धाव घेत आहेत़ तर काहींनी यापूर्वीच गावे सोडले आहेत़ त्यामुळे गावे ओस पडली आहेत़ गावात वृद्ध माणसेच दृष्टीस पडत आहेत़ पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे़ एखादया गावात टँकर आले तर त्यावर शेकडो माणसांची पाण्यासाठी झुंबड उडत आहेत़ त्यातून भांडणे, वाद होत आहेत़ टँकर येणार म्हणून रस्त्याच्या कडेला भांडयांची लांबलचक रांग पहाटेपासूनच लागत आहे़ पिण्यासाठी पाणी मिळेल की नाही, अशी चिंता त्यांना पडली आहे़ मुखेड, लोहा, कंधार, नायगाव, देगलूर या तालुक्यात पाणी टंचाई अधिक जाणवत आहे़ जिल्हा परिषदेची पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा पाणीटंचाई निवारण्यासाठी उपाययोजना करण्यात गुंतली आहे़ १ आॅक्टोबर २०१५ ते ५ एप्रिल २०१६ या कालावधीत नवीन विंधन विहिरी घेणे, नळ योजनांची दुरूस्ती करणे, टँकरने पाणीपुरवठा करणे, विहिरीतील गाळ काढणे आदी कामे करण्यात आली असून यासाठी १९ कोटी ३८ लाख ८५ हजार रूपये खर्च झाले आहेत़ ७८७ गावे व १२५ वाड्यातील खाजगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या असून यासाठी ५ कोटी ७० लाख १३ हजार रूपये खर्च झाले आहेत़ तर १७४ गावे व १३८ वाड्यावर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी १२ कोटी ९१ लाख ४३ हजार रूपये खर्च केले आहेत़ पाणी टंचाई निवारण कार्यक्रमातंर्गत तयार केलेल्या आराखड्यातील आतापर्यंत २५ कोटी ३८ लाख ४५ हजार रूपयांना मंजुरी दिली आहे़ दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसेवकांना त्या - त्या गावात राहण्याचे व तेथील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत़ मात्र काही ग्रामसेवक गावात जाऊन कामे करण्यास अनुत्सूक आहेत़ मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी नुकतेच दोन ग्रामसेवकांना कामात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून निलंबित केले आहे़ काही ग्रामसेवक आठ - आठ दिवस गावात येत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करत आहेत़ यापार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे म्हणाले, दुष्काळामुळे सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे़ अशा वेळी प्रशासकीय यंत्रणेने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्परता दाखविली पाहिजे़ काही ग्रामसेवकांना या प्रश्नांचे गांभीर्यच राहिले नाही़ गावात पाणी, चारा, मजुरांच्या हाताला काम अशी अनेक कामे प्रलंबित आहेत़ याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी जर वेळीच प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले तर नक्कीच दुष्काळावर आपण मात करू़ संबधित कर्मचारी, अधिकाऱ्यांनी दुष्काळाच्या प्रश्नांकड दुर्लक्ष केल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल़ दर आठवड्याला एका गावात जाऊन त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी मुक्काम करून तेथील नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे़ या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे़ (प्रतिनिधी)