शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीचा पाणीसाठा ४३ टक्के

By admin | Updated: September 12, 2014 00:29 IST

पैठण : जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याने धरणात आवक सुरू असून पाणीपातळी ४२.२८ टक्के झाली आहे.

पैठण : जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याने धरणात आवक सुरू असून पाणीपातळी ४२.२८ टक्के झाली आहे. विसर्ग गुरुवारी घटविण्यात आल्याने धरणातील आवक कमी होत आहे. धरणात ११०५० क्युसेक्स क्षमतेने पाणी दाखल होत आहे.जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस उघडला असल्याने तेथील धरणातून गुरुवारी विसर्ग मोठ्या प्रमाणात घटविण्यात आला. नांदूर मधमेश्वर मधून १४,४४४, गंगापूर २,०८८, ओझर वेअर ३,३४६, निळवंडे ३,५४९, भंडारदरा २,०३०, दारणा ५,४२३, मुळा १,५०० क्युसेक्स विसर्ग करण्यात येत आहे.नागमठाण येथील सरिता मापन केंद्रावर गोदावरी १६,४०० क्युसेक्स क्षमतेने वाहत आहे. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता धरणाची पाणीपातळी १५०९.५० फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा १६५६.१६५ दलघमी झाला असून यापैकी ९१८.०५९ दलघमी उपयुक्त (जिवंत) जलसाठा आहे.जायकवाडीवरील धरणातील जलसाठा मुळा- ९३.३० टक्के, भंडारदरा- १०० टक्के, दारणा- ९५.२४ टक्के, गंगापूर- ९२.४६ टक्के, करंजवन- ९२.०५ टक्के, नांदूर मधमेश्वर ७२.७६ टक्के, ओझरखेड- ५६.९३ टक्के, पालखेड- १०० टक्के, निळवंडे- १०० टक्के.२०१२ ला जायकवाडीची मोठी बिकट अवस्था झाली होती. यावर्षी धरणात २० नोव्हेंबरला ३.२० टक्के जलसाठा झाला होता. यानंतर मुळा धरणातून सोडलेले पाणी २९ नोव्हेंबर २०१२ ला जायकवाडीत दाखल झाले. या पाण्यामुळे १४ डिसेंबर रोजी जलसाठा ९.३३ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता, अशी माहिती धरण नियंत्रण कक्षातून आर. ई.चक्रे यांनी दिली. (वार्ताहर)अहमदनगर जिल्ह्यातील धरणे १०० टक्के भरलेली असताना जायकवाडीसाठी ओझर वेअरमधून पाणी सोडणे गरजेचे होते, मात्र असे न होता चक्क मुळा व ओझर वेअरचे कालवे मोकळे सोडून पाणी वळविण्यात आले. यंदा हे पाणी आले असते तर जायकवाडी आत्ताच ६२ टक्के भरले असते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. १० प्रकल्प अजूनही कोरडे,४२ चा साठा जोत्याखालीऔरंगाबाद : पावसाळा संपत आला असला आणि जायकवाडी धरणातील साठ्यात वाढ झाली असली तरी जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांची स्थिती अतिशय वाईट आहे. जिल्ह्यातील १० लघु प्रकल्प पूर्णपणे अजूनही कोरडेच आहेत. तर ४२ प्रकल्पांमधील साठा जोत्याखाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात १६ मध्यम आणि ९० लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची एकत्रित साठवण क्षमता ४४३ द. ल. घ. मी. आहे; परंतु सध्या या प्रकल्पांमध्ये ११० द. ल. घ. मी. इतका साठा आहे.मागील पंधरा दिवसांत पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली; पण तरीही जून, जुलै आणि आॅगस्ट या तीन महिन्यांत पुरेसा पाऊस न पडल्याने बहुसंख्य प्रकल्प रिकामेच होते. त्यामुळे आजही जिल्ह्यातील प्रकल्प भरलेले नाहीत. जिल्ह्यातील १० लघु प्रकल्पांमध्ये अजून थोडेही पाणी साचलेले नाही. तर ४२ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखालीच आहे. यात ६ मध्यम आणि ३६ लघु प्रकल्पांचा समावेश आहे.जिल्ह्यात सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यांतील प्रकल्पांची परिस्थिती चांगली आहे. या दोन तालुक्यांत एकही प्रकल्प कोरडा नाही. औरंगाबाद, कन्नड, गंगापूर, फुलंब्री आणि पैठण तालुक्यांतील प्रकल्पांमध्ये मात्र जेमतेम साठा आहे. प्रकल्पांतील पाणीसाठ्याचा विचार करता १५ प्रकल्प ७६ ते १०० टक्क्यांदरम्यान भरले आहेत. तर ५१ ते ७५ टक्के यादरम्यान साठा असलेल्या प्रकल्पांची संख्या केवळ ५ इतकी आहे. १४ प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांदरम्यान साठा आहे. तर २० प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे.