शिरूर अनंतपाळ : महसूल खात्यात तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार आदी महत्वाच्या पदावर उत्कृष्ट कार्य करून चार वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दैठणा येथील रहिवाशी असलेल्या जनार्दन बिरादार यांना हक्काचा भविष्य निर्वाह निधीच मिळाला नाही़ यासाठी त्यांनी नागपूर पेन्शन विभागास त्याच जिल्हाधिकारी कार्यालयास अनेक वेळा पत्र व्यवहार केला आहे़ परंतु, त्याचा त्यांना कोणताही उपयोग झाला नाही़ त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर भविष्य अंधारात जाण्याची वेळ आली असून, निर्वाह सुद्धा ठप्प झाला आहे़भविष्य निर्वाह निधीचा वापर सेवानिवृत्तीनंतर चांगल्या पद्धतीने होईल आणि त्यावर निर्वाहासाठी योग्य उपयोग करता येईल़ यासाठी महसूल खात्यात योग्य उद्योग रूजु झालेल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दैैठणा येथील कार्यालयांतर्गत मंडळाधिकारी, नायब तहसीलदार आदी महत्वाच्या पदावर कार्य करून २०१० मध्ये रेणापूर तहसील कार्यालयातून सेवानिवृत्त झाले़ तेव्हा सेवानिवृत्तीनंतर त्यांना तात्काळ भविष्य निर्वाह निधीचा लाभ मिळणे आवश्यक होते़ परंतु, चार वर्ष उलटले तरीही त्यांना भविष्य निर्वाह निधीचे एक लाख रूपये हक्काचे असूनही अद्यापपर्यंत मिळाले नाहीत़(वार्ताहर)याबाबत त्यांना नागपूरच्या पेन्शन विभागास अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे़ तर त्यांना सेवा कालावधीत भविष्य निर्वाह निधीतून उचललेले २० हजार रूपये परत भरणा केल्याचा पुरावा सादर करावे, असे उत्तर देण्यात आहे़ वास्तविक या २० हजारांचे हप्ते सोवानिवृत्तीपूर्वी प्रत्येक महिन्याच्या पगारातून कपात झाले आहेत़ तसे रेणापूर तहसील कार्यालयाने नागपूर पेन्शन विभागास कळविलेसुद्धा, तरीही पेन्शन विभागास जाग येत नाही़ सेवानिवृतीच्या फाईलमध्ये सर्व प्रकारचे नादेय प्रमाणपत्र जोडूनही केवळ २० हजार परत केल्याचे पुरावे सादर करा म्हणून उर्वरित ८० हजार अडकवून ठेवले आहेत़
चार वर्षांपासून भविष्य निर्वाह निधीची प्रतीक्षा
By admin | Updated: November 5, 2014 00:58 IST