शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

विठ्ठलनामाचा गजर

By admin | Updated: July 10, 2014 00:58 IST

बीड : कपाळी गोपीचंदनाचा टिळा, मुखात विठूरायाचे नाव अन् चरणी नतमस्तक होऊन कृतार्थ पावण्यासाठी लागलेल्या रांगा़़़ असे भक्तिमय व उल्हासित चित्र बुधवारी जिल्हाभरातील विठ्ठल मंदिरांमध्ये पहावयास मिळाले़

बीड : कपाळी गोपीचंदनाचा टिळा, मुखात विठूरायाचे नाव अन् चरणी नतमस्तक होऊन कृतार्थ पावण्यासाठी लागलेल्या रांगा़़़ असे भक्तिमय व उल्हासित चित्र बुधवारी जिल्हाभरातील विठ्ठल मंदिरांमध्ये पहावयास मिळाले़ आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्याची धाकटी पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायणगड, चाकरवाडी, कंकालेश्वर या मंदिरांमध्ये लाखो भाविकांनी दाटीवाटीने दर्शन घेतले़ ‘राजा पंढरीचा’ चित्रपटातील भक्तिगीताप्रमाणे जणू काही विठ्ठलनामाची शाळाच भरली होती़महिन्यापासून ओढ दिलेल्या पावसाने आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. ‘विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल...’ , भेटी लागी जीव लागलीसी आस... या आणि अशा अनेक अभंगांचे स्वर दिवसभर मंदिरांच्या परिसरात घुमत होते. मध्यरात्रीपासूनच ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. सकाळी विठ्ठल- रुक्मिणीच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून महापुजा करण्यात आली. ग्यानबा तुकारामच्या जयघोषांनी मंदिरे दुमदुमून गेली. बीडमध्ये कंकालेश्वर मंदिर, सहायोगनगरातील विठ्ठल- रुक्मिणी मंदिर, सोमेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी झाली. बीड तालुक्यातील कुर्ला येथील महादे मळी येथील संगमेश्वर संस्थानवरही मोठी गर्दी उसळली. याशिवाय बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी, शिरुर येथील सिद्धेश्वर संस्थान, परळी येथील वैद्यनाथ मंदिर, विठ्ठल मंदिर, आष्टी तालुक्यातील कपारीचा विठ्ठल मंदिरातही दिवसभर भाविकांची मांदियाळी पहावयास मिळाली. ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम भक्तीभावात पार पडले. मंदिर प्रशासन, सामाजिक संस्थांच्या वतीनेभाविकांना महाप्रसाद व पाण्याची सोय केली होती. जागोजागी तगडा बंदोबस्त होता. बसगाड्याही भाविकांच्या गर्दीने खचाखच भरुन वाहत होत्या.धाकट्या पंढरीत भाविकांची मांदियाळीचिखल-माती तुडवित मैलोनमैल पायी आलेल्या वारकऱ्यांनी बुधवारी मनोभावे ‘लाडक्या विठुरायाचे’ दर्शन घेतले. दोन तासांपेक्षा अधिकवेळ दर्शनबारीमध्ये उभे राहून दर्शन घेतलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर ‘याज साठी केला होता अट्टाहास..’ असे भाव दिसून आले. बीड तालुक्यातील श्री क्षेत्र नारायण गड येथे देवशयनी एकादशीनिमित्त दोन लाखांपेक्षा अधिक भाविकांनी गर्दी केली होती. अडीचशे वर्षांपेक्षा अधिक काळाची परंपरा असलेल्या या गडावर वैष्णवांची मांदीयाळी भरली होती. येथे वर्षानुवर्ष गावोगावहून भाविकांची दिंडी येते. बुधवारीही गेवराई, बीड, पाथर्डी आदी तालुक्यांतून पायी दिंड्या आल्या होत्या. नारायणगड धाकटी पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे प्रत्त्येक एकादशीनिमित्त भाविक येतात. आषढी एकादशीनिमित्त तर भाविकांची सर्वाधिक गर्दी असते. बुधवारीही येथे पायी दिंड्यासह दुचाकी, चारचाकी, ट्रक, टेम्पो आदी वाहनांमधून मोठ्याप्रमाणावर भाविक दाखल झाले होत. तर, कित्त्येक परिसरातील गावांतून पायी आले होेते. हाती झेंडे, मुखी हरिनाम...डोक्यावर तुळशीकलश..टाळ-मृदंगाचा ताल...अशा भक्तीमय वातावरणात लहान-थोर तल्लीन झाल्याचे दिसून आले. येथे आलेल्या भाविकांनी पहाटे ४ पासूनच दर्शनसाठी गर्दी केली होती. सकाळी ९ पासून तर भाविकांची गर्दी अधिकच वाढली होती. यामुळे तब्बल एक कि.मी. पेक्षा अधिक अंतरावरून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी अनेक महिला-पुरुष भाविक दर्शनबारीमध्ये भजन गाऊन विठूनामाचा गजर करीत असल्याचे दिसून आले. बुधवारी सकाळपासूनच गडावर येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढू लागल्याने बेलुरा, साक्षाळपिंंप्री, पौंडूळ हे गडावर येणारे रस्ते भाविकांनी फुलून गेले होते. सावळा पांडुरंग...नारायण महाराज यांची समाधी यासह यावेळी संतांचे दर्शन झाल्याने ‘धन्य आजी दिन...संत दर्शनाचा’ असे भाव भाविकांतून दिसून आले.ट्रॅफिक जामने भाविकांचे हालसाक्षाळपिंप्री व बेलुरा येथून गडावर येताना गडाजवळ घाट आहे. बुधवारी दुपारी भाविकांच्या वाहनांची गर्दी वाढली होती. या दोन्ही घाटामधून सुरळीत वाहतूक व्हावी, यासाठी दरवर्षी पोलीस बंदोबस्त असतो. यावर्षी मात्र अपुरा पोलीस बंदोबस्त असल्याने दोन्हीकडील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे येथून रस्ता काढण्यास भाविकांना दोन तासांपेक्षा अधिक वेळ लागला. तसेच ट्रॅफिकजाममुळे लहानमुलांसह महिलांना एक ते दीड कि.मी. पायी यावे लागले. बीडमध्ये ठिकठिकाणी फराळाची सोयआषाढी एकादशीनिमित्त शहरात ठिकठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात आले. बीड आॅटोरिक्षा व अपेरिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने बसस्थानकाजवळ भाविकांसाठी मोफत फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये त्यांनी ४ क्विंटल साबुदाणा खिचडी भाविकांसाठी वाटप केली. सुग्रीव शिंदे, लक्ष्मण जवंजाळ, संदीप भैरागे, किरण गवळी, मुकेश काळके, बाळू तांबडे, सचिन शिंदे आदींनी यासाठी परिश्रम घेतले. सकाळी सात वाजल्यापासून ते दुपारी ३ पर्यंत फराळाचे वाटप करण्यात आले होते. यामध्ये केळी, चिंकू आदी फळांचेही वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र देशमुख, संतोष खटोड, दीपक परदेशी, भाईजी चरखा, बाळू काळे, बाळू ढोले आदींनी साठे चौकात भाविकांना तीन क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप केले.विद्यार्थ्यांनी केली साफ सफाईपेठ बीड भागातील विठ्ठल मंदिरात सकाळी पाच वाजता महापूजा, सहा वाजता प्रभातफेरी, सात वाजता महाआरती करण्यात आली. त्यांनतर नगरसेवक राजेश क्षीरसागर यांनी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी फराळाची व्यवस्था केली होती. बालगोपाळांच्या दिंड्याही काढण्यात आल्या होत्या. येथील राष्ट्रीय कन्या शाळेच्या विद्यार्थींनींनी मंदिरातील साफसफाई केली. सकाळी पहाटपासूनच भाविकांनी दर्शनसाठी गर्दी केली असल्याचे येथील पुजारी चिन्मय एकनाथ महाराज यांनी सांगितले. मंगळवारी दिवसभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचेही पुजारी एकनाथ महाराज यांनी सांगितले.महिलांनी गायले भजनशहरातील सहयोग नगर भागातील सर्व्हेश्वर मंदिरात महिलांनी भजन गायले. रात्री उशिरापर्यंत सर्वेश्वर महिला भजनी मंडळीच्या महिलांनी भजन गायले. यावेळी भाविक -भक्तांचीही मोठी उपस्थिती होती.(प्रतिनिधी)धाकट्या पंढरीत दोन लाख भाविकबीड तालुक्यातील नारायणगड येथे बुधवारी पहाटे विठ्ठल-रखुमाईची पूजा झाली. भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवसभरात तब्बल दोन लाखांपेक्षा अधिक भाविकांचे सुरळीत दर्शन झाल्याचे महंत ह.भ.प. शिवाजी महाराज नारायणगडकर यांनी सांगितले. गडावर खेळणी, फराळाचे साहित्य विक्रीसाठी आले होते़ मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता़भाविकांसाठी फराळनारायणगड येथे साक्षाळपिंप्री, बेलुरा, पौंडूळ, शिरसमार्ग, बहाद्दरपूर, पोखरी-मानकापूर, केतुरा आदी ठिकाणहून रस्ते जातात. हे रस्ते भाविकांनी ओसंडून वाहत होते. दूरदूरहून येणाऱ्या दर्शनासाठी अनेक भाविकांनी ठिकठिंकाणी फराळाची मोफत व्यवस्था केली होती. काही भाविकांनी गडावरही भाविकांसाठी फराळाची व्यवस्था केली होती.