जालना : लोकसभा मतदारसंघाचे पुन्हा नव्याने विजयी झालेले खा. रावसाहेब दानवे यांची विजयश्री मिरवणूक संभाजी उद्यान येथून दुपारी ४ वाजता निघाली. संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर या मिरवणुकीस प्रारंभ झाला. आपल्या वाहनाच्या टपावर बसून खा. दानवे नागरिकांच्या अभिनंदनाचा स्वीकार करून सर्वांचे आभार मानत होते. यावेळी त्यांच्यासमवेत माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, आ. संतोष सांबरे, रिपाइंचे मराठवाडा अध्यक्ष अॅड.ब्रह्मानंद चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. ठिकठिकाणी महिलांनी दानवे यांना ओवाळून त्यांचे औक्षण केले. कार्यकर्ते फटाक्यांची आतषबाजी करीत, गाण्यांवर ठेका धरून आपला आनंद व्यक्त करत होते. गणपती गल्ली, शनि मंदिर, टाऊन हॉल, गांधी चमन येथे पोहोचली. या मिरवणुकीत पंडितराव भुतेकर, किशोर अग्रवाल, विष्णू पाचफुले, वीरेंद्र धोका, भाऊसाहेब घुगे, अॅड. संजीव देशपांडे, बद्रीनाथ पठाडे, देवीदास देशमुख, बळीराम कडपे, वसंत जगताप, बाला परदेशी, सविता किवंडे, वंदना कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गुलालाची मुक्त उधळण दानवे हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. त्यामुळे पहिल्या, दुसर्या फेरीपासून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष सुरू केला. दानवेंच्या भोकरदन आणि जालन्यातील घरासमोर सकाळी ११ वाजेच्या सुमाराच कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण करून फटाक्यांची आतषबाजी केली.
महायुतीकडून विजयाचा जल्लोष
By admin | Updated: May 17, 2014 00:20 IST