शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

घाटीत सुपरस्पेशालिटी उपचार

By admin | Updated: November 2, 2014 00:23 IST

औरंगाबाद :घाटी रुग्णालयात (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय) दाखल होणाऱ्या रुग्णांना लवकरच सर्व गंभीर आजारांवरील सुपरस्पेशालिटी उपचार उपलब्ध होणार आहे.

औरंगाबाद : गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयात (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय) दाखल होणाऱ्या रुग्णांना लवकरच सर्व गंभीर आजारांवरील सुपरस्पेशालिटी उपचार उपलब्ध होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या साहाय्याने घाटीत २०० खाटांचा स्वतंत्र सुपरस्पेशालिटी विभाग सुरू होणार आहे. या विभागासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून १५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सुपरस्पेशालिटी विभागाच्या इमारतीसाठी प्रशासनाने उपलब्ध केलेल्या जागेची पाहणी केंद्रीय पथकाने ३१ आॅक्टोबर रोजी केली.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील शासकीय रुग्णालयातील उपलब्ध आरोग्य सुिवधांचे अपग्रेडेशन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गतवर्षी यासाठी घाटीची निवड झाली. मराठवाड्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय म्हणून घाटीची ओळख आहे. या रुग्णालयात मराठवाडा आणि शेजारील जिल्ेंतील रुग्ण दाखल होतात. काही वर्षांपूर्वी तेथे स्वतंत्र नवजात शिशू अति दक्षता कक्ष सुरू झाला. या विभागात गंभीर आजारासह जन्मलेल्या बाळांवर उपचार केले जातात. विभाग चिमुकल्यांसाठी आशेचा किरण ठरला आहे. या सुपरस्पेशालिटी युनिटप्रमाणेच उरोशल्यचिकित्सा आणि हृदयरोग विभागही २००९ मध्ये सुरू झाला. या विभागामुळे विभागातील हृदयरोग्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय कृत्रिम मूत्रपिंड प्रत्यारोेपण आणि मूत्ररोग विभागाची स्वतंत्र इमारत घाटीत उभारण्यात आली. यासोबतच सर्जरी विभाग, घाटी रुग्णालयात २०० खाटांचा स्वतंत्र सुपरस्पेशालिटी विभाग सुरू करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून तब्बल १५० कोटी रुपये मिळणार आहेत. सुपरस्पेशालिटीची इमारत बांधण्यासाठी उपलब्ध जागेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील आर्किटेक्ट जयेंद्र नामदेव यांनी ३१ आॅक्टोबर रोजी घाटीला भेट दिली. यावेळी अधिष्ठाता डॉ. के.एस.भोपळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश मगरे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता यांनी सर्जरी इमारतीच्या मागील जागा इमारतीसाठी उपलब्ध असल्याचे दाखविले. ही जागा आर्किटेक्ट जयेंद्र यांनी पसंत केल्याचे घाटीच्या सूत्राने सांगितले. स्वतंत्र विभागात होणार ४ विभागांचे स्थलांतरसुपरस्पेशालिटी विभागाच्या इमारतीत सर्जरी, कान, नाक, घसा, आॅर्थोपेडिक आणि भूलशास्त्र विभागाचे स्थलांतर केले जाणार आहे. कान, नाक, घसा विभागात बहिरेपणा घालविणारे कृत्रिम कर्णरोपण शस्त्रक्रिया तज्ज्ञ करतील. आॅर्थोपेडिक विभागात खुबा प्रत्यारोपण, गुडघा प्रत्यारोपण, खांदा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे डॉक्टरांना शक्य होणार आहे. सर्जरी विभागातही अत्यंत गुंतागुंतीच्या आणि किचकट शस्त्रक्रिया केल्या जातील.