लातूर : औसा तालुक्यातील नागरसोगा येथे पाच कुपनलिकांचे पुनर्भरण केल्याने परिसरातील दीडशे कुपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ झाली़ या प्रयोगाची ख्याती नाशकात पोहोचली असून तिथे पुनर्भरणाच्या कामास गती आली आहे़औसा तालुक्यातील नागरसोगा येथे पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या विभागामार्फत पाच कुपनलिकेचे पुनर्भरण करण्यात आले़ यामध्ये पाचही बोअरच्या केसिंगला छिद्र पाडून १० बाय १० फुट खड्डे खोदून त्यामध्ये अर्धा फुट खडी, अर्धा फुट खडीचा कच बसवून बोअरचे पुनर्भरण गतवर्षी करण्यात आले़ यामुळे परिसरातील १०० ते १५० बोअरच्या पाणीपातळीत वाढ झाली असल्याने दुष्काळी परिस्थितीत ग्रामस्थांना राष्ट्रीय ग्रामीण पेयजल शास्वतता कार्यक्रमांतर्गत फायदा झाला़ त्या उपक्रमाची दखल घेऊन नाशिक येथे स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या वतीने मित्रा इन्स्टीट्युट मार्फत घेण्यात आलेल्या कार्यशाळेत पुनर्भरण केलेल्या प्रक्रियेच्या व्हिडीओचे सादरीकरण करण्यात आले़ त्या पुनर्भरणाच्या प्रक्रियेमुळे उपस्थित नांदेड, उस्मानाबाद, बीड व लातूर येथील पंचायत समिती सदस्यांनीही कौतूक केले़ यापुढील कालावधीत लातूर जिल्ह्यातील जलयुक्त गावामध्ये कुपनलिका पुनर्भरणाचा फायदा ग्रामस्थांना मिळणार आहे़ (प्रतिनिधी)औसा तालुक्यातील नागरसोगा गावात गतवर्षी मे मध्ये पाच बोअरचे पुनर्भरण केल्यामुळे परिसरातील अनेक बोअरच्या पाणीपातळीत वाढ झाली़ तर काही ठिकाणी बंद पडलेल्या बोअरलाही पाणी येत असल्याने याचा दुष्काळी परिस्थितीत आधार मिळत असल्याचे पंचायत समिती सदस्य दत्तोपंत दिगांबर सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ पुनर्भरणाचा लाभच़़़४लातूर जिल्ह्यातील भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत १०९ विहिरींचे निरीक्षण केले जाते़ यामध्ये गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत ३़५५ मिटरने पाणीपातळीत घट झाली असली तरी नागरसोग्याबरोबरच इतर ठिकाणी केलेल्या पुनर्भरणाच्या उपक्रमामुळे पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे़ चांगले पर्जन्यमान झाले असते तर पुनर्भरणाचा खरा फायदा ग्रामस्थांच्या लक्षात आला असता, असे वरिष्ठ भूवैज्ञानिक एम़एम़ शेख यांनी सांगितले़
बंद पडलेल्या बोअरलाही पाणी़़़ नागरसोग्याचा प्रयोग नाशकात
By admin | Updated: February 2, 2016 00:27 IST