निलंगा : निलंगा शहरातील एका महाविद्यालयाच्या वर्कशॉपच्या पाठीमागील बाभळीच्या झाडास अज्ञात महिलेचा मृतदेह बांधल्याचे बुधवारी सांयकाळी आढळून आले़ शरीरावरील जखमा पहाता हा खून झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे़शहरातील महाराष्ट्र इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या वर्कशॉपच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बाभळीच्या झाडास बुधवारी सायंकाळी एका अज्ञात ६० वर्षीय महिलेचा मृतदेह बांधल्याचे आढळून आले़ सदरील मयत महिलेच्या गळ्यास तिच्याच साडीने बांधल्याचे निदर्शनास आले़ घटनास्थळास पोलिस निरीक्षक औदुंबर खेडेकर यांनी भेट देऊन पाहणी केली़ निलंगा पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला़ यावेळी नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती़ सदरील महिलेची अद्यापही ओळख पटली नाही़ विशेष म्हणजे शरीरावर, डोक्यावर जखमा झाल्याचे पहावयास मिळाल्याने हा खूनाचा प्रकार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ (वार्ताहर)
निलंग्यात अज्ञात महिलेचा खून?
By admin | Updated: January 22, 2015 00:43 IST