शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आता मुलांना लिहिण्या अगोदर वाचण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 17:58 IST

पायाभूत चाचणीनंतर २२ जानेवारीपासून पाच स्तरीय कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात ६७ टक्के मुलांना वाचायला येत असल्याचे निश्चित झाले असून, मार्चअखेरपर्यंत जिल्ह्यातील ८५ टक्के मुलांना वाचायला आलेच पाहिजे, असे उद्दिष्ट आहे

औरंगाबाद : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आता मुलांना वाचायला येण्यावर भर देण्यात आला आहे. पायाभूत चाचणीनंतर २२ जानेवारीपासून पाच स्तरीय कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात ६७ टक्के मुलांना वाचायला येत असल्याचे निश्चित झाले असून, मार्चअखेरपर्यंत जिल्ह्यातील ८५ टक्के मुलांना वाचायला आलेच पाहिजे, असे उद्दिष्ट प्रादेशिक विद्या प्राधिकरणाने निश्चित केले आहे. 

पहिल्या टप्प्यात शाळा व वर्गनिहाय मुलांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळांतील इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतची १ लाख ४७ हजार मुले निश्चित करण्यात आली आहेत. आता दुसरा टप्पा सुरू असून, महिनाभराच्या सरावानंतर आता शाळा- वर्गऐवजी मूलनिहाय वाचन क्षमता तपासली जाणार आहे. यामध्ये पहिलीच्या मुलांना वाचता येणे, दुसरीच्या व तिसरीच्या मुलांना वाचता व लिहिता येणे, चौथीच्या मुलांना वाचता, लिहिता, बोलता तसेच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येणे आणि पाचवीच्या मुलांना वाचलेले स्वत:च्या शब्दात व्यक्त करता येणे, या पाच टप्प्यांची पडताळणी केली जाणार आहे. हा उपक्रम जानेवारीपासून सुरू झाला असून, साहित्य पेट्या मात्र, फेब्रुवारीमध्ये शाळांस्तरावर पोहोचल्या आहेत. शाळा पेट्या शाळास्तरावर पोहोच करण्यासाठी विद्या प्राधिकरणाने ‘बीडीओं’कडे आर्थिक तरतूदही केली आहे; परंतु  शिक्षकांना पदरमोड करीत  शाळा पेट्या घेऊन जाण्याची वेळ आली आहे. 

२२ मार्च रोजी पडताळणीया संदर्भात प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुभाष कांबळे म्हणाले की, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळांतील शंभर टक्के मुलांना वाचायला आले पाहिजे. यासाठी एक ‘टूल’ तयार करण्यात आले असून, या माध्यमातून सध्या मुलांचा सराव घेतला जात आहे. २२ मार्च रोजी त्या- त्या शाळांतील शिक्षक मुलांची वाचन क्षमता तपासतील. मार्चअखेरपर्यंत ८५ टक्के मुलांंना वाचायला येईल, अशी अपेक्षा आहे.