उज्जैनपुरी : तालुक्यातील उज्जैनपुरी येथे विहिरीवरील पाणी घेण्याच्या वादातून ज्ञानदेव नामदेव वाघ यांचा डोक्यात तलवारीने घाव घालून निर्घूण खून करण्यात आला. ही घटना ३ आॅक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता घडली. दरम्यान, याप्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी दोघांना अटक केली. पाण्यावरून व शेतीच्या बांधावरून ज्ञानदेव वाघ व सोमनाथ वाघ यांच्यात यापूर्वीच वाद झालेला होता. त्यातून ज्ञानदेव वाघ यांच्यावर ३ आॅक्टोबर रोजी सोमनाथ वाघ याने मोटारसायकल (एम.एच.२१ ए.एल. ६८०८) अंगावर टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात गंभीर जखमी झालेले ज्ञानदेव यांच्यावर अशोक वाघ याने पाठीमागून तलवारीने डोक्यात तलवारीने वार करून खून केला. त्यानंतर पुन्हा अशोक वाघ, राधाबाई सोमीनाथ वाघ, द्वारकाबाई रामभाऊ वाघ, सुलोचना दगडू वाघ, गणेश दगडू वाघ, कैलास देठे, सुमन अशोक वाघ यांनी गजाने मारून गंभीर जखमी केले. फिर्यादी प्रल्हाद याप्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अटकेतील अशोक रामभाऊ वाघ व द्वारकाबाई रामभाऊ वाघ या दोघा आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
उज्जैनपुरीतील खून प्रकरणी दोघांना अटक
By admin | Updated: October 5, 2014 00:48 IST