चेतन धनुरे , उदगीरयेथील उपजिल्हा रुग्णालयातील स्वाईन फ्ल्यू कक्षात पुरेसी काळजी घेतली जात नव्हती़ सलग दोन दिवस केलेल्या पाहणीतून समोर आलेल्या बाबी गुरुवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर प्रशासनाने या कक्षावर विशेष निगराणी सुरु केली आहे़ स्वाईन फ्ल्यू या संसर्गजन्य आजाराला उपजिल्हा रुग्णालयातच कर्मचारी व रुग्ण किती सहजपणे घेत आहेत, हे उजेडात आणल्यानंतर आता रुग्ण, नातेवाईक व कर्मचारीही सतर्क झाल्याचे गुरुवारी आढळून आले़ सकाळी ओपीडीत गेले असता, तेथे रुग्णांची नेहमीप्रमाणे वर्दळ दिसून आली़ मात्र जे डॉक्टर विनामास्क रुग्ण तपासत होते, तेच आज स्वत: मास्क वापरुन रुग्ण तपासताना दिसून आले़ (अधिक वृत्त हॅलो/२ वर)
‘लोकमत’ वृत्तानंतर उदगीरचा स्वाईन कक्ष अपडेट्
By admin | Updated: March 13, 2015 00:42 IST