उस्मानाबाद : बचतगट तसेच इतर उपक्रमाच्या माध्यमातून महिला जागृत होत आहेत. अशा वेळी कनगरा येथे घडलेली घटना म्हणजे महिलांनी दारूबंदीविरुद्ध उठविलेल्या आवाजाला दडपण्याचा प्रकार असल्याचे जि. प. सदस्या अर्चनाताई पाटील यांनी सांगितले. बुधवारी सकाळी त्यांनी कनगरा येथे जाऊन मारहाण झालेल्या व्यक्तींची तसेच त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले. या घटनेमुळे पुढील काळात जिल्ह्यातील महिला दारूबंदीसाठी पुढाकार घेण्यास धजावणार नसल्याची भीती यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रकरणातील दोषी अधिकारी, कर्मचार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही पाटील यांनी पोलिस महानिरीक्षक जगन्नाथ यांच्याकडे केली. अत्याचार करणार्या पोलिस अधिकार्यांची मराठवाड्याबाहेरील अधिकार्यांमार्फत चौकशी करावी, फरार दारूविक्रेत्याला तात्काळ अटक करावी, निरपराध ग्रामस्थांची सुटका करावी, आदी मागण्या त्यांनी केल्या. त्यांच्या समवेत नगराध्यक्ष रेविताताई बनसोडे, राकाँच्या महिला जिल्हाध्यक्ष नंदाताई पुनगडे, शहराध्यक्ष वंदनाताई डोके आदी उपस्थित होत्या. ‘सीआयडी’ चौकशीची मागणी महिलांनी वारंवार निवेदने देऊनही अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली नाही. हा प्रकार गंभीर आहे. उलटपक्षी दारूबंदीची मागणी करणार्या ग्रामस्थावर अमानुष अत्याचार करून पोलिसांनी दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी प्रदीप खंडापूरकर, विलास शेंडगे, अॅड. एस. एस. सीतापुरे, अतुल बांगर, विशाल माने, शेख जमीर आदींनी निवेदनादरे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. मनसेचे लाक्षणिक आंदोलन उस्मानाबाद : कनगरा येथील नागरिकांना पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन केले़ दारूबंदीसाठी सहकार्य न करणार्या पोलिस अधिकारी, कर्मचार्यांसह नागरिकांना बेदम मारहाण करणार्या पोलिसांच्या रझाकारी कारवाईचा निषेध करण्यात आला आहे़ अंनिसकडून निषेध उस्मानाबाद- कनगरा मारहाण प्रकरणी पोलिसांच्या रझाकारी वृत्तीचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी एम. डी. देशमुख, भाग्यश्री वाघमारे,बालाजी तांबे, सत्यजित सिरसट, अॅड. देविदास वडगावकर, शीतल वाघमारे, अॅड. गोपाळ पाकले यांनी दारूबंदीचे कार्य करणार्यांना पोलिस प्रशासनाने पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली.
दारूबंदीविरुद्धचा आवाज दडपण्याचा प्रकार
By admin | Updated: May 29, 2014 00:29 IST