शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
4
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
5
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
6
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
8
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
9
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
10
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
11
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
12
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
13
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
14
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
15
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
16
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
17
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
18
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
19
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
20
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...

ऊस वाहतूक ट्रॅक्टरवरील दोघे चालक ठार

By admin | Updated: November 21, 2014 00:27 IST

सातारा तालुका : दोन अपघातांत ११ जण जखमी; मृत नगर, औरंगाबाद जिल्ह्यांतील

सातारा : सातारा तालुक्यात विविध दोन ठिकाणी झालेल्या अपघातांत दोघेजण ठार तर सुमारे ११ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहीची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, गोजेगाव येथील अपघातात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवरील दोघे चालक जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी रात्रीच्या सुमारास घडला. चालक हे अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सातारा तालुक्यातील गोजेगाव हद्दीत इरिगेशन कॉलनीजवळ अपघात झाला. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडलेल्या होत्या. त्यामध्ये ऊस भरलेला होता. या ट्रॉल्या घेऊन ट्रॅक्टर सातारा बाजूकडून शेंद्रे कारखान्याकडे जाण्यासाठी येत होता. गोजेगाव हद्दीत आल्यावर ऊस भरलेल्या ट्रॉलीची मागील कडी तुटली. त्यामुळे टॅ्रक्टरवरील दोघे चालक खाली उतरून मागे आले. त्यावेळी ट्रॉलीला दगड लावताना पाठीमागून भरधावपणे कार (एमएच ०४ इडब्लू २३९३) आली. या कारने दोघा चालकांना ठोकरले. दोघेही चालक टॉलीखाली गेले व कारही ट्रॉलीत अडकली. या अपघातात दोघेही चालक जागीच ठार झाले. बाळू एकनाथ सोनावणे (वय ४०, रा. पालवी, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) आणि अंबादास एकनाथ वैरागर (वय ३०, रा. शेवगाव, जि. अहमदनगर) अशी मृत चालकांची नावे आहेत. दरम्यान, कारमधील चालक संतोषकुमार बाळकृष्ण तारू (वय ३६, रा. तासगाव, ता. सातारा), राजेशकुमार बाळकृष्ण तारू (वय ३४), जयश्री राजेशकुमार तारू (वय ३२), धनश्री राजेशकुमार तारू (वय ६, तिघेही रा. श्रीनगर वागळे इस्टेट, ठाणे) तसेच भागुबाई लक्ष्मण शिर्के (वय ५०, रा. कुसुंबी, ता. जावळी) हे जखमी झाले. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार डी. डी. कदम, एन. डी. चव्हाण अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)टेम्पोच्या अपघातात जखमी गुरुवारी पहाटेच्या सुमारास साताऱ्याजवळ खिंडवाडी येथे महामार्गावर अपघात झाला. टेम्पो (एमएच १२ जीटी ९०१५) डिव्हाइडरला धडकून हा अपघात झाला. यामध्ये राघवेंद्र सिद्रामप्पा बकलगी (वय २८) आणि रेखा राघवेंद्र बकलगी (वय २३, दोघेही रा. खिंडवाडी, सातारा. मूळ रा. बकलगी, ता. अफजलपूर, जि. गुलबर्गा) तसेच तात्यासो माणिक माने (वय २७), पुंडलिक सलगरे (वय २७) आणि चालक सोमनाथ सगर (वय ३०, तिघेही रा. हडपसर पुणे) आणि भाग्यश्री (वय ४०, पूर्ण नाव नाही. रा. खडकी, पुणे) हे जखमी झाले. या जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.