सिल्लोड : मुख्य संगणकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बँक आॅफ महाराष्ट्रच्या सिल्लोड शाखेचे दैनंदिन व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प आहेत. खातेदारांना गेल्या दोन दिवसांपासून बँकेत चक रा माराव्या लागत आहेत. मंगळवारीही व्यवहार सुरळीत न झाल्याने संतप्त नागरिकांनी शाखा उपप्रबंधकास घेराव घालीत धारेवर धरले. बँकेचा व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प असतानादेखील शाखा प्रबंधक एस.आर. रोडगे बँकेकडे फिरक ले नाहीत, हे विशेष. शनिवारी बँके त अपुरे कर्मचारी व हाफ डे असल्याने नागरिकांची कामे होऊ शकली नाहीत. यामुळे सोमवारी बँकेत नागरिकांची मोठी गर्दी झाली; परंतु बँकेच्या मुख्य संगणकात तांत्रिक बिघाड झाल्याने बँकेची सर्व कामे ठप्प झाली. यामुळे सोमवारीही नागरिकांची कामे खोळंबली. मंगळवारी बँके चे काम सुरळीत सुरू होईल, असे बँकेच्या उपप्रबंधकांकडून सांगण्यात आले होते; परंतु मंगळवारीही संगणकातील तांत्रिक बिघाड दुरुस्त न झाल्याने नागरिकांची कामे होऊ शकली नाहीत. सलग तीन दिवसांपासून बँकेच्या खातेदारांची कामे न झाल्याने त्यांना आल्या पावली परत जावे लागले. बँकेच्या संगणकातील तांत्रिक बिघाड व शाखा प्रबंधक व उपप्रबंधक यांच्या हलगर्जीपणामुळे गेल्या तीन दिवसांपासून खातेदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बँक आॅफ महाराष्ट्रचे शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात खातेदार आहेत. सध्या लग्नाची धूम सुरू आहे. पावसाळा जवळ आल्याने शेतकरी बी-बियाणे खतांची जमवाजमव करीत आहेत. यासाठी पैशांचा ताळमेळ करण्यासाठी खातेदार बँकेत मोठी गर्दी करीत आहेत; पण बँकेतील तांत्रिक अडचणींमुळे तीन दिवसांपासून आर्थिक व्यवहार न झाल्याने खातेदारांनी रोष व्यक्त केला. बँकेत नेहमीच अपुरे कर्मचारी राहत असल्याने खातेदारांना तासन्तास बँकेत ताटकळत बसावे लागते, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर खातेदारांनी लोकमतशी बोलताना दिली. बँक आॅफ महाराष्ट्रचे शाखा प्रबंधक दि. १८ मे ते दि.२४ पर्यंत ट्रेनिंगसाठी गेलेले होते. मंगळवारीही ते बँकेकडे फिरकले नाहीत. या संदर्भात त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता ते नॉट रिचेबल होते. (वार्ताहर) संगणक दुरूस्त करून आणले, तरीही तांत्रिक बिघाड बँकेतील मुख्य संगणकात तांत्रिक बिघाड झाल्याने सोमवारी आर्थिक व्यवहार होऊ शकले नाहीत. खातेदारांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्काळ संगणक औरंगाबाद येथे नेऊन दुरुस्त करून आणले; परंतु मंगळवारी पुन्हा मुख्य संगणकात तांत्रिक बिघाड आल्याने आर्थिक व्यवहार होऊ शकले नाहीत - दिनेशकुमार मिश्रा, उपप्रबंधक, बँक आॅफ महाराष्ट्र शाखा, सिल्लोड.
दोन दिवसांपासून महाराष्टÑ बँकेत व्यवहार ठप्प
By admin | Updated: May 28, 2014 01:12 IST