तुळजापूर : तुळजापूर पोलिसांनी घटनास्थळावरून आणलेल्या अपघातग्रस्त टेम्पोत तब्बल अडीच टन मांस आढळून आले़ हा प्रकार शनिवारी रात्रीच्या सुमारास समोर आला असून, टेम्पोचा चालक फरार झाला असून, जखमी क्लिनरवर तुळजापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ या प्रकरणी चालकासह क्लिनरविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, उस्मानाबाद येथून तुळजापूरकडे शनिवारी रात्रीच्या सुमारास येणाऱ्या टेम्पोचा (क्ऱएम़एच़०९- एल़६१६५) तुळजापूर नजीक अपघात झाला होता़ घटनेची महिती मिळाल्यानंतर तुळजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला़ घटनास्थळी पोलीस दाखल होताच चालक रसुल युसूनस शेख (रा़उस्मानाबाद) हा घटनास्थळावरून पळून गेला़ तर अपघातात जखमी झालेला क्लिनर प्रविण बाळू बनसोडे (रा़उस्मानाबाद) हा पोलिसांना टेम्पोतच आढळून आला़ पोलिसांनी जखमी बनसोडे याला उपचारासाठी तातडीने तुळजापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले़अपघातग्रस्त टेम्पोची पाहणी केली असता आतमध्ये दोन ते अडीच टन मांस असल्याचे दिसून आले़ या प्रकरणी पोउपनि जमदाडे यांच्या फिर्यादीवरून टेम्पो चालक व क्लिनर या दोघाविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोउपनि अनिल किरवाडे हे करीत आहेत़ (वार्ताहर) अपघातग्रस्त टेम्पोत मांस आढळून आल्यानंतर पोलिसांनी तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेतले़ मांसाचे पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला असून, मांसाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत़ तपासणीनंतरच हे मांस कोणत्या प्राण्याचे आहे, हे समोर येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले़नगर पालिकेला पत्र४अपघातग्रस्त टेम्पात जवळपास दोन ते अडीच टन मांस आढळून आले आहे़ या मांसाचा पोलिसांनी पंचनामा केला असून, जप्त केलेल्या मांसाची विल्हेवाट लावण्याबाबत नगर पालिकेला पोलिसांनी पत्र दिले आहे़ आता मांसाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नगर पालिकेवर येऊन पडली आहे़अहवालानंतर पुढील कारवाई४याबाबत तुळजापूर पोलीस ठाण्यातील सपोनि अनिल किरवाडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जप्त केलेल्या मांसाचे काही तुकडे तपासणीसाठी औरंगाबादच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत़ या तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे़ शिवाय फरार ट्रकचालकाचा शोध सुरू असून, त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असेही किरवाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
अपघातग्रस्त टेम्पोत आढळले अडीच टन मांस
By admin | Updated: November 16, 2015 00:37 IST