जालना : प्रभावी जनजागृती सोबतच योग्य आणि वेळेत उपचार यामुळे क्षयरोग निर्मूलनाचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. क्षयरोग हा मायकोबक्टेरियम नावाच्या जीवानूमुळे होतो. हा आजार माणसाला फार पूवीर्पासून माहीत असून प्रचीन काळी त्याला राजयक्ष्मा या नावाने संबोधले जायचे. क्षयरोग प्रामुख्याने फुफुसांना होत असला तरी तो शरीराच्या लसीकाग्रंथी, मेंदू, हाडे, मूत्रपिंड, यासारख्या अवयवांनासुद्धा होऊ शकतो. क्षयरोगाचा प्रसार हवेद्वारे होतो. जेव्हा फुफुसाच्या क्षयरोगाणे आजारी असणारी व्यक्ति शिकते किंवा खोकते तेव्हा क्षयरोगच्या जिवाणूंचा प्रसार होतो. डॉ. रॉबर्ट कॉच यांनी या जीवाणूंचा शोध लावला. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. योगेश सुरळकर म्हणाले, क्षयरोगावर डॉटस प्रणालीचा वापर केल्यास क्षयरोग शंभर टक्के बरा होतो. सहा ते आठ महिन्यांचा पूर्ण कोर्स न झाल्यास क्षयरोग बरा होण्या उशिर लागतो. या रोगींनी डॉटस उपचार पद्धतीचा पूर्ण वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.२०१६ मध्ये १३५२ क्षयरोगी आढळले. त्यांच्यावर डॉटसचा उपचार करण्यात आला. यातील सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक रूग्ण ठणठणीत झाले आहेत. डॉ. राजेश सेठिया यांनी क्षयरोग दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्धपत्रक काढून क्षयरोगाबाबत मार्गदर्शन केले. योग्य उपचार आणि काय काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचे डॉ. सेठिया यांनी सांगितले. हा रोग शंभर टक्के बरा होऊ शकतो.
जनजागृतीतून क्षयरोग निर्मूलन..!
By admin | Updated: March 24, 2017 00:33 IST